About Me




शोध

बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत
तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा
शोध लागत आहे मला
माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला

माहीत नव्हते मला माझे बळ, माझी दुर्बलता,
सतत मला वेढून बसलेली माझी भीरूता
माझे माझ्याशी असलेले भांडण,
माझ्या निकट सहवासातलेही माझे एकाकीपण,
काहीच उमगत नव्हते यांतले
होते केवळ असह्य घुसमटणे एका अथांगातले...

आता आतल्या आत मी आहे उलगडत,
क्षणोक्षणी विस्तार पावत,
पोहोचते आहे जाऊन
माझ्याच अंतरंगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत,

मी चकित होते आहे, स्तिमित होते आहे,
दुखावत आहे आणि सुखावतही.

शांता शेळके


Contact Me

Name

Email *

Message *