Lesson Learned

Help always comes when you ask for it, and from unexpected places.

Of late, तन्मयीच्या रोजच्या घडामोडींशी जुळवून घेण्यासाठी स्वतःला वेळ देणं, तिच्यासाठी सतत न थकता available असणं, पूर्ण वेळ नोकरी, अर्धवेळ घरकाम ह्या सगळ्या रगाड्यात socialization ला जागाच उरलेली नाही. कधीतरी कुणाशीतरी बोलताना त्यांनी अगदी specific असं काही विचारलं तर तिच्या developmental delays बद्दल सांगायचं असा नियम स्वतःला घालून घेतला होता. हो नं! एकतर इतक्या दिवसांनी एखाद्या व्यक्तीशी बोलायचं, आणि तिथेही रडगाणी गाऊन आपल्या जखमा सोलवटून घ्यायचा उद्योग सांगितलाय कुणी! शिवाय बहुतेकांना empathy ऐवजी sympathy च दाखवणं जमतं. मला ते अजिबात नको असतं. त्यामुळे बहुतेकवेळा बहुतेकजणांच्या प्रश्नांना एक आपलं generic "मस्त मजेत" एवढं उत्तर देऊनही काम तमाम होतं, पुढे काही विचारायला कुणालाही वेळ नसतो असा अनुभव वारंवार येत होता. सुरुवातीला त्या अनुभवाशी जुळवून घेणंही जड जात होतं. म्हणजे अगदी नेहमी सहवासात असणारे लोकही, ज्यांच्याशी मी आवर्जून contact ठेवून होते, ते सगळेही "out of sight, out of mind" असे वागायला लागलेयत असं वाटत होतं. म्हणजे मी contact केला नाही तर त्यांनीही विचारायचं नाही? बरं, त्यातल्या काहीजणांना आम्ही नेमके कोणत्या मनःस्थितीतून जातोय ते माहीत होतं, आणि तरी त्यांनी पाठ फिरवल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मनात एक प्रकारचा कडवटपणाही भरत चालला होता.


ह्या सगळ्यामधे मला आलेले उलट अनुभव मी विसरत चाललेय असं आज जाणवून गेलं आणि जरासं कृतघ्न झाल्यासारखं वाटलं. 


खरं तर काहीजण असे असतात की त्यांच्याशी बोलता बोलता आपण अगदी चटकन मनातलं बोलून जातो आणि मग आपसूक आपल्या ध्यानी-मनी नसताना त्या व्यक्तीकडून support मिळतो. रोहितची सुप्रियाआत्या, संपदा, तेजश्री, स्नेहल, तिचा नवरा संजोग हे सगळे ह्या categoryतले. ह्यातल्या काहीजणांना त्यांच्या मुलाच्या बाबतीत काहीसे similar, if not this extreme, अनुभव आलेले आहेत. So त्या बाबतीत त्यांच्याकडून एका वेगळ्याच प्रकारचं understanding मिळालं.    


घरातल्यांची गोष्टच वेगळी होती. आई, अनिरुद्ध, आनंदमामा, संजूकाका हे सगळे, आणि सासूबाई (होय, त्यांच्या स्वभावाच्या बऱ्यापैकी विरोधात जाऊन त्यासुद्धा) तर रोहित आणि माझ्यासोबत प्रत्येक कठीण क्षण जगलेत. आम्ही काहीही न विचारता चारुमावशीने इथं येऊन आमच्या मदतीसाठी राहायचा बेत ठरवला, तिच्या डॉक्टरांना consult करून आम्हाला आयुर्वेदिक औषधं सुचवली. माझी आजीसुद्धा... she is just available, and that alone is support enough!


And my coworkers are no different. They have been there throughout if I ever wanted to talk about anything. Paul has given me the freedom to choose my schedule. हे असं सगळीकडे नाही मिळत हे विसरून नाही चालणार. पुढच्या वर्षभरात कधीतरी मला तन्मयीसाठी break घ्यावा लागेल असं आज जेव्हा मी त्याला सांगितलं तेव्हा तो पटकन म्हणाला "Baby first, job later. Ease your mind, and don't worry about the job stuff. We will work something out." I felt as though I have been incredibly blessed with this kind of a support system.


आता इथून पुढे एकच गोष्ट करायची - I must absorb all experiences, but only keep the good ones with me so I can pass the goodness on. Lesson learned!

Comments

Contact Me

Name

Email *

Message *