न्यू मेक्सिको: १
ख्रिसमसच्या आठवड्यात आम्ही न्यू मेक्सिकोला गेलो होतो. कित्येक वर्षांनी अनिरुद्ध आणि आईसोबत ट्रिप काढली. आजीपण होती. खरं तर तन्मयी लहान असल्यामुळे कुठे जायचं की नाही हे सुरुवातीला ठरत नव्हतं. पण रोहित आणि मी कसले स्वस्थ बसतोय! एवढी मोठी सुट्टी, आणि no trip? Next to impossible. ह्याच सुमारास मागच्या, म्हणजे २०१६च्या, ख्रिसमसला आम्ही तन्मयीची वाट बघत हातावर हात ठेवून घरात बसलो होतो. पण तन्मयीनं आमची ती अख्खी सुट्टी literally वाया घालवली... १२ जानेवारीपर्यंत मॅडमचा पत्ता नाही. आणि तेव्हाही तिला जबरदस्तीनं induce करूनच बाहेर आणावं लागलं! त्यामुळे यंदाची सुट्टी तिला घेऊन सत्कारणी लावायची असं ठरायला फार वेळ लागला नाही. शिवाय आम्हालाही जरा बदल हवाच होता.
डिसेंबरमध्ये आई आणि आजी इथे असतील हे आधीच ठरलं होतं, मग अनिरुद्धला पण विचारलं.. तो ही लगेच तयार झाला आणि ठिकाणही त्यानंच सुचवलं. तो आधी कामानिमित्त जाऊन आलेला असल्यानं त्याला जुजबी माहिती होती. त्या basis वर त्यानं आणि रोहितनं मिळून bookings केली, schedule ठरवलं. I was just going along for the ride this time. Generally मी planning phase मध्ये खूप involved असते. पण ह्या ट्रिपला शून्य input होतं माझ्याकडून. नाही म्हणायला ते दोघे बसलेले असताना एकदा मी Lonely Planet चं पुस्तक हातात घेतलं होतं, पण माझा सहभाग तेवढ्यापुरताच. बाकी सगळं काम त्यांचं. It was a bizarre experience for me to be so disconnected from the planning. I wonder how Rohit must have felt, because trip planning is our thing. We have always, always done it together.
परिणामी न्यू मेक्सिकोत काय बघावं, काय खावं-प्यावं, इतर खास तिथल्या activities काय; मला कशाचाही गंध नव्हता जाताना. फक्त एक ऐकलं होतं की तिथे खूप मोठा art scene (म्हणजे नक्की काय देव जाणे) आहे. शिवाय नेहमीच्या सवयीनुसार आदल्या दिवशी बॅग भरून चालणार नव्हतं - कारण तन्मयीच, दुसरं कोण?! नाही म्हणायला तिला अगोदरच विकतच्या बेबीफूडची सवय करून दिली होती, त्यामुळे तितका प्रश्न नव्हता. शेवटी हे आण-ते उचक करत बॅगा आदल्या रात्रीच फायनल भरल्या गेल्या.
आम्ही जाताना रेल्वे आणि येताना विमानानं प्रवास करणार असल्यामुळे गाडी नेऊन स्टेशनवर लावली असं करता येणार नव्हतं. त्यामुळे उबरचा सोपा पर्याय निवडला. कॅब बोलावताना एकच ६-सीटर गाडी बोलवायची की २ छोट्या गाड्या बोलवायच्या ह्यावर आदल्या रात्री ११:३० वाजता चर्चासत्र झडून finally २ छोट्या गाड्या बोलवायचं ठरलं कारण सामान खूप होतं. ३ सुटकेसेस, ३ backpacks, तन्मयीचा स्ट्रोलर ऊर्फ pram, तिची कारसीट, आजीची व्हीलचेअर आणि वॉकर असं सगळं मिळून जरा अतीच झालं होतं. Seemed too much to handle even before we left, and as we would later find out, it was!

Waiting for next chapter...
ReplyDelete