न्यू मेक्सिको: २ Land of Enchantment
पुढचे २४ तास मात्र आम्ही खा-प्या-तन्मयीला खेळवा-झोपा एवढंच करत होतो.
अल्बुकर्कीत हॉटेलला पोहोचून सगळेजण सामान आवरून, जेवून झोपून गेलो. Oh no, wait! विसरलेच! आमच्याच खोलीतल्या टॉयलेटचा फ्लश चालत नव्हता नाही का! मग खोली बदलणं ओघाओघानं आलंच. तो उद्योग पार पाडला, आणि नवीन खोलीतला फ्लश नीट चालतोय नं ह्याची खात्री करून घेऊनच मग झोपलो.
Tanmayee ready for the climb! |
ह्यापूर्वी कोणत्याही विमानप्रवासात रडणारी बाळं आसपास असली की वाटायचं त्यांचे आई-वडील शांत का करत नाहीयेत त्यांना. तन्मयीनंही तसाच दंगा मांडल्यावर समजलं की हे काही खरं नव्हे... आपल्याला नको असलेली गोष्ट बाजूला झाल्याशिवाय बाळं काही रडायची थांबणार नाहीत! माझा बॉस Paul त्याबाबतीत खरंच amazing आहे. तो नेहमी म्हणतो की स्वतः त्याने ४ मुलं वाढवल्यामुळे आता प्रवासात रडणारं मूल आसपास असलं तरी त्याला काहीही वाटत नाही!
असो, coming back to the topic... तर अल्बुकर्कीपासून साधारण ४५ मिनिटांवर ही जागा आहे. रोपवेनं वर जाता येतं, किंवा उत्साही ट्रेकर्स चढूनही जातात. आमच्यासोबत ११ महिन्यांचं बाळ आणि माझी ८० वर्षांची आजी असल्यामुळे आम्ही ह्यातलं काय करणार हे clear होतं.
प्रत्यक्ष त्या डोंगरावरून - खरंतर त्याला शिखर म्हणायला हवं ("peak" चं literal translation), पण त्या लांबवर पसरलेल्या वाळवंटात हा एकच डोंगर आहे मधेच...त्याला शिखर तरी कसं म्हणायचं? Anyway, तर त्या डोंगरावरून आजूबाजूचा साधारण २८,००० sq.km.चा area दिसतो. त्यात अल्बुकर्की आणि आसपासचे काही छोटे-मोठे डोंगर आणि लांबवर पसरलेलं वाळवंट दिसतं.
At Sandia Peak |
Albuquerque: the view from Sandia Peak |
View from atop the peak |
वर करायला तसं फार काही नव्हतं. नाही म्हणायला आम्ही रोपवेने चढलो त्याच्या पलीकडच्या बाजूला skiing चा area होता. पण तो चालू नव्हता. वर बांधलेल्या viewing decks वरून थंडीत कुडकुडत सगळं (विहंगम का काय म्हणतात ते?!) दृश्य डोळ्यांत भरून घेतलं; आणि थोडंसं कॅमेऱ्यातसुद्धा (ते रोहित आणि अनिरुद्धनं)! अनिरुद्धनं त्याच्या कॅमेराला लावायला हीsssss मोठ्ठी अवाढव्य लेन्स आणली होती... काय काय लांबवरचं कॅमेरात तो टिपत होता!
रोपवेनं जाताना त्या डब्यात एक guide वजा रोपवेचा operator होता. तो बरीचशी माहिती देत होता. म्हणजे रोपवे कधी बांधला, तो अमेरिकेतला उंचीने तिसऱ्या क्रमांकाचा रोपवे कसा आहे, त्याला २ च टॉवरने कसा support दिलेला आहे वगैरे वगैरे. तर त्याच्याच सांगण्यावरून, "Sandia" म्हणजे स्पॅनिशमध्ये watermelon अथवा कलिंगड. सूर्यास्ताच्या वेळी ह्या डोंगराची जी लाल shade दिसते, त्यामुळे ह्याला Sandia Peak असं नाव दिलंय म्हणे. संध्याकाळी आई, आजी आणि तन्मयीला हॉटेलला सोडून रोहित, मी आणि अनिरुद्ध छोट्या drive ला बाहेर पडलो तेव्हा हा रंग पाहिला. Highway वरून जाताना उजव्या बाजूला लांबच लांब पसरलेलं वाळवंट आणि डावीकडे नजरेत न मावणारा लालभडक उंच डोंगर... It was beginning to dawn on me on that evening why New Mexico is called Land of Enchantment.
"Sandia" Peak at Sunset |
mastch Madhura...Sagala diwas athavala mala...:)
ReplyDelete