The Happiness Project




परवा Gretchen Rubin चं podcast ऐकत असताना तिच्या एका innovative project बद्दल ऐकलं - One Sentence Journal. त्यानुसार 'आज काय झालं,' 'कसं वाटलं,' 'दिवस कसा गेला' ह्याबद्दल रोज एक वाक्य लिहायचं. असं किमान ५ वर्ष करायचं, म्हणजे मग आपल्याकडे एक unique record तयार होतं आपल्याच आयुष्याचं. रोज बसून मोठ्या डायरीची पानं ज्यांना भरता येत नाहीत त्यांच्यासाठी मस्त प्रयोग आहे हा.



अजून एक मस्त डायरी सापडली काल online surfing करताना... आपण दिवसभरात कोणते पदार्थ खाल्ले, व्यायाम काय केला आणि त्याबद्दलचे आपले feelings असं record ठेवण्यासाठी डायरी. खूप खोलात शिरून exact कॅलरीचं रेकॉर्ड वगैरे नाही, तर अगदी मोघम - पदार्थांची नावं, व्यायामप्रकाराची नोंद वगैरे. यातून मुख्यतः आपल्या स्वतःच्या खाण्यापिण्याच्या, व्यायामाच्या सवयी आणि आपल्याला कोणत्या पदार्थांचं craving होतं हे आपलं आपल्याला समजलं तरी fit राहणं सोपं जाईल अशी संकल्पना आहे. 

मला हे सर्व रोज करणं शक्य आहे का माहीत नाही, पण ह्या २ गोष्टी येत्या वीकेन्डपासून करेन असं म्हणतेय. One Sentence Journal आणि Fitness Diary, दोन्हीचा ९० दिवस प्रयोग करून बघणार आहे. जमलं तर वर्षभरासाठी नियमित करेन. बाकी पुढचं पुढे. 😊

Cheers!

Comments

Contact Me

Name

Email *

Message *