श्रीगणेशाय नमः|

माझ्या नवऱ्याने फेसबुकवर ब्लॉगची लिंक शेअर करताना खूप छान लिहिलंय - "When our Daughter struggled with her health, Madhura and I both found our own ways, to gather strength. It prompted her to pen down her thoughts."
लिखाणाच्या निमित्तानं होणाऱ्या, आपले ओबडधोबड विचार साध्यासोप्या वाक्यात मांडण्याच्या प्रक्रियेतून कधी कधी आपल्याला आपल्याच भावना तिऱ्हाईताप्रमाणे observe करण्याची संधी मिळते. तन्मयीच्या निमित्ताने माझे अस्थिर झालेले विचार ह्या मार्गानं तरी मला स्थिर करता येतील का असं मनात आल्याने एक दिवस मी थेट लिहायलाच सुरुवात केली. ब्लॉगच्या archive मधल्या जुन्या पोस्ट बघितल्यात तर तुम्हाला हे समजेलच.
बरं, चालू असलेला विषय इतका personal होता की कदाचित डायरी लिहिणं जास्त योग्य ठरलं असतं का असंही वाटत होतं एकीकडे. पण ह्याआधी शाळेत असताना आईच्या आग्रहाखातर , आणि नंतर स्वतःहून एकदोनदा मी डायरी लिहिण्यात सपशेल नापास झाले होते. ४ दिवस कसंबसं काहीतरी खरडून मग सरळ डायरीला रामराम ठोकला जायचा. त्यामुळे रोजची दैनंदिनी/अनुदिनी अशी लिहिणं was not my cup of tea. त्यापुढे ब्लॉगचा मार्ग सगळ्यात सुकर वाटला.

पुरेसे विषय सुचणं आणि त्यावर काहीतरी perspective मांडता येणं हे दोन्ही असल्याशिवाय कोणताही ब्लॉग वाचनीय होऊच शकत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीं मला जमतील ह्याची खात्री झाल्यावर मगच मी माझा ब्लॉग publish करायचा निर्णय घेतला.
आता आम्ही मागच्याच आठवड्यात सिएटल-ऑलीम्पिक नॅशनल पार्क अशी ९ दिवसांची ट्रिप काढली, त्याविषयी लिही असं काहींनी already सुचवलंय. बघू. नुसतं साच्यातलं प्रवासवर्णन न लिहिता इतर कोणत्या angle ने ट्रिपविषयी लिहिता आलं तर नक्की लिहीन.
Until then, cheers!
Comments
Post a Comment