Introducing: Stuck in Pixels
मागच्या माझ्या एका पोस्टमध्ये मी आमच्या न्यूझीलंड ट्रिपचा उल्लेख केला होता. त्या ट्रिपमध्ये रोहितला (की नीरज म्हणू?) त्याच्यातला फोटोग्राफर पहिल्या प्रथम पूर्णपणे आजमावता आला. तोपर्यंत तो फोटोग्राफी करत नव्हता असं नव्हे. DSLR त्याच्याकडे आधीपासूनच होता, म्हणजे जवळजवळ १० वर्षांपूर्वी. पण आमच्या निगडीच्या बागेत येणारे पक्षी आणि काही छोट्या ट्रिप्स ह्यापलीकडे त्याची फोटोग्राफी कधी गेली नाही.
न्यूझीलंडइतका वेगळा निसर्ग आम्ही प्रथमच अनुभवत होतो. तिथले स्वर्गीय नजारे बघून त्याला काय करू नि काय नको असंच होत होतं! ती रोडट्रिप आम्ही अतिशय निवांतपणे केली. वाटेत असंख्य ठिकाणी थांबत थांबत गेलो... केवळ त्याला फोटो काढता यावेत म्हणून! रस्त्यावर चिटपाखरू नाही, दूर-दूरपर्यंत एकही गाडी नाही, फक्त आम्ही दोघे. तो निसर्गाचे फोटो काढतोय आणि मी त्याचे! तेव्हापासून जवळजवळ प्रत्येक ट्रीपमध्ये आमचं असंच चालतं.
आता त्यानं स्वतःची एक वेबसाईट सुरु केलेली आहे - Stuck in Pixels. त्यानं काढलेले फोटो तुम्ही इन्स्टाग्राम वरसुद्धा बघू शकता. त्यातून त्याची फोटोग्राफीची आणि प्रवासाची आवड तो तुमच्याशी share करतोय... I hope तुम्हाला त्याचे अनुभव आणि फोटो दोन्हीही आवडेल.
_________________________________________
Rohit (or should I say Neeraj) got a full-blown experience of the photographer in him during our trip to New Zealand. I think I've mentioned that trip before in one of my previous posts. He loved photography even before that trip. Though he owned a DSLR almost a decade ago, he mostly photographed birds in his own backyard and a few animals here and there.
The landscapes and vistas we got to experience in New Zealand were beyond our imagination at the time. So magnificent that he was like a kid in a candy store. We stopped at innumerable places along the way during our drives through the back country roads of South New Zealand. With not a soul in sight, no vehicles to disturb the views, it was just the two of us at most of these spots. He was capturing the beauty surrounding us in his camera, and I, him, in mine. That became the norm for all of our trips since.
He has now ventured out to start a new website to share his love for travel, photography and travel photography with you. It's called Stuck in Pixels. You can also follow him on Instagram. I hope you will enjoy reading his travelogues and his photographs.
Lake Superior, Duluth, Minnesota, USA |
Sleeping Bear Dunes, Michigan, USA |
Old Town Albuquerque, New Mexico, USA |
Vermont, USA |
Thor's Well, Oregon, USA |
Olympic National Park, Washington, USA |
Olympic National Park, Washington, USA |
Comments
Post a Comment