ऑलिम्पिक नॅशनल पार्कला जायचं ठरवलं तेव्हा कल्पना नव्हती की इतकं काही वेगवेगळं पाहायला, अनुभवायला मिळेल. Rainforests, बीचेस आणि उंच बर्फाच्छादित शिखरं असं सर्व फक्त १० लाख एकरच्या परिघात मावलंय.
पॅसिफिक नॉर्थवेस्ट, म्हणजेच सिएटल (अर्थात वॉशिंग्टन राज्य), त्याच्या दक्षिणेकडचं ओरेगन राज्य आणि उत्तरेकडचा कॅनडाचा थोडा भाग असं मिळून जो प्रदेश आहे तो...ज्याच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागर आणि पूर्वेला कॅस्केड पर्वतरांग आहे... तर ह्या भागातले समुद्रकिनारे आणि ती कॅस्केड पर्वतरांग हे दोन्ही अतिशय प्रेक्षणीय आणि थोडे हटके आहेत. ऑलिम्पिक नॅशनल पार्कमध्ये तर ह्याच्यावर कडी म्हणूनच जणू २ rainforests आहेत!
सिएटलच्या पश्चिमेला समुद्रात जमिनीचा काही भाग extend होतो, त्याचं नाव ऑलिम्पिक पेनिन्सुला, म्हणजे मराठीत "द्वीपकल्प". ह्या पेनिन्सुलावर ऑलिम्पिक नॅशनल पार्क आहे. सिएटलपासून साधारण १.५-२ तासांवर. नॅशनल पार्कखेरीज इथे दुसरं खास काही नाही. जी काही छोटी मोठी गावं आहेत ती एकमेकांपासून लांब आहेत, आणि तिथं फारशी वस्तीदेखील नाही. संध्याकाळी ६-६:३० नंतर बहुतेक दुकानं बंद होतात. Port Angeles म्हणून तिथलं जे सगळ्यात मोठं गाव आहे त्याचीच लोकसंख्या २०,००० च्या आसपास आहे, म्हणजे पुण्याच्या फक्त ०.५%!
आम्हाला सिएटलहून निघून परत सिएटलला यायचं होतं. ९-१० दिवस हाताशी असले तरी सगळं पाहायला पुरेसे नव्हते, शिवाय सोबत तन्मयी! त्यामुळे आम्ही तिथली हिमशिखरं पाहायची नाही असं अगोदरच ठरवलं आणि Hurricane Ridge च्या भागावर जड मनानं पाणी सोडलं. आमचा साधारण प्लॅन होता तो ह्या मॅपमध्ये दिसतोय तसा. म्हणजे आम्ही मुख्यतः बीचेस आणि rainforests हेच जास्त पाहिलं. Airbnb तर्फे Moclips, Quinault Rainforest च्या जवळ एके ठिकाणी, आणि Sequim ला रात्रीची सोय केली, आणि जिथे मुक्काम होता त्याच्या आसपास भटकण्यात बाकी वेळ घालवला.
भटकंतीत काय काय बघितलं आणि बघताना काय काय वाटलं हे लिहायला घेतल्यावर लक्षात आलं, की ह्या वेळी लिहिणं जरा अवघड आहे. कितीही काही लिहिलं तरी वाटत होतं की the written word is failing to do justice to the whole experience. म्हणून ठरवलं, it's best to show you some photographs accompanied by small captions. Enjoy!
|
१९१ फूट उंच, १००० वर्ष जुना, जगातला सर्वात मोठा सिट्का स्प्रूस |
|
शेवाळ्याने लगडलेलं स्प्रूसचं झाड |
|
वर्षावनातली (अर्थात rainforest) भटकंती |
इथल्या सर्व नॅशनल पार्क्सप्रमाणे ह्याही पार्कमध्ये सगळीकडे भरपूर trails आहेत. Hiking ला भरपूर वाव आहे.
आम्ही नॅशनल पार्कमध्ये शिरण्यापूर्वी एका visitor centre मध्ये थांबलो होतो. अश्या centres मध्ये साधारणपणे Forest Rangers किंवा guides असतात, त्या पार्कचेआणि परिसराचे नकाशे असतात. आपण ज्या ऋतूत तिथं भेट देतोय त्यावेळी पार्कमध्ये एखादं ठिकाण safe नसेल तर ती माहिती, किंवा कोणत्या trails वर गेल्यावर प्राणी दिसू शकतील इ. माहिती तिथं आपल्याला मिळते.
सर्वसाधारणपणे rainforest मध्ये ठिकठिकाणी मोठाले वृक्ष कोसळणं हे खूप common आहे. आम्ही गेलो तेव्हाही काही काही trails असे वृक्ष कोसळल्यामुळे बंद होते. visitor centre मधल्या guide ने सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्या trail वर गेलो, तिथंही आम्हाला असे आधी कधीतरी कोसळलेले वृक्ष दिसलेच. पण environmental conservation आणि येणाऱ्या hikers ची सोय ह्याचा सुरेख मेळ साधत Forest Rangers नी पडलेल्या वृक्षांची विल्हेवाट न लावता, केवळ trail वर पडलेला भाग कापून तिथंच बाजूला टाकून दिला होता. ह्या फोटोत रोहितसमोरही असाच एक वृक्ष आहे. तो बराच आधी कधीतरी पडलेला असणार. कारण त्यावर पुन्हा शेवाळं आणि छोटी रोपं उगवलेली दिसतायत...
|
Hall of Mosses - Hoh Rainforest. इथलं जवळजवळ प्रत्येक झाड असं दिसत होतं.
शेवटी शेवटी आम्हाला इतक्या vivid हिरव्या रंगाचा overdose झाला होता! |
|
Baby Elk! This took us by complete surprise! आम्ही trail वर निम्मे अंतर आलो असू-नसू तोच धोधो पाऊस पडायला लागला. तन्मयी माझ्या कडेवर होती. ती, तिचा रेनकोट, माझा रेनकोट असं सगळं सांभाळत मी, आणि कॅमेरा जपत रोहित असे चिखलातून वाट तुडवत होतो. तेवढ्यात समोर एक जोडपं दिसलं. त्यातल्या बाईने हळूच आम्हाला "श्श ssss " अशी खूण केली. आम्ही एक्दम सावध झालो. आणि जवळ जाऊन बघतो तर अक्षरश: ५ फुटांवर हे पिल्लू दिसलं. क्षणभर आम्ही डोक्यावर पडत असलेला पाऊसही विसरलो होतो. |
|
Hoh River... नदी, पर्वत, निळंभोर आकाश, शुभ्र ढग, मोठाले वृक्ष.. सगळं अगदी कसं लहानपणी चित्रकलेच्या तासाला रंगवत होतो तस्सं! |
|
Tree Root Cave/Tree of Life - ह्या झाडाची बहुतेक मुळे जमिनीतून बाहेर आलेली आहेत...
खाली छोटी गुहा तयार झालीय.
तरीही, miraculously, हे झाड तुकतुकीत दिसतं... तग धरून आहे... जिवंत आहे. |
|
पॅसिफिक नॉर्थवेस्ट, म्हणजेच सिएटलकडचा भाग... तिथला एक टिपिकल बीच...
काळसर रंगाची वाळू, पॅसिफिकचं थंडगार पाणी आणि लाटांमुळे झिजलेले ओबडधोबड खडक |
|
Ruby Beach
|
|
Second Beach. हे ह्या बीचचं नाव आहे. |
|
Tidepools. Ok, so... भरती येऊन गेल्यानंतर किनाऱ्यावरच्या खडकांच्या आजूबाजूला जो सखल भाग तयार होतो, त्यात थोडं पाणी साचून राहातं (tidepools), आणि starfish किंवा शंख-शिंपल्यासारखे छोटे प्राणी त्यात अडकून पडतात. शोधलं (tidepool hunting) तर ओहोटीच्या वेळी खडकांच्या खालच्या बाजूने चिकटून बसलेले ते आपल्याला दिसतात. पुन्हा भरती आली की समुद्रात परत जातात. |
|
Tidepool मधला प्राणी .. तो हिरवा दिसतोय नं? तो.. |
|
सूर्यास्त |
|
धबधब्यांची अनेक रूपं इथं पाहायला मिळाली...
|
|
खोल धबधबा |
|
धबधब्याचं रौद्र स्वरूप! |
Comments
Post a Comment