योग आणि बरंच काही
मी ह्या पुस्तकातून योगासनं शिकले |
Sitting with minimal support |
यानिमित्तानं मी योगासनं आणि एकंदरीत "योग" ह्याविषयी अवांतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून मला समजलेलं थोडं असं...
नुसता एक शब्द म्हणून "योगा"कडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तो किती वेगवेगळ्या संदर्भात आपण वापरतो. आपल्याला सर्वात जास्त परिचित असलेला संदर्भ म्हणजे "योगासन" (योग + आसन). आणखी एक सर्वपरिचित संदर्भ आहे तो स्वामी विवेकानंदांमुळे प्रचलित झालेल्या ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग इ. चा.
प्रत्यक्षात "योग" फक्त शारीरिक व्यायामापुरता मर्यादित नसून, ती एक जीवनशैली (lifestyle) आहे. संस्कृतातल्या "युज्" धातूपासून "योग" शब्द उत्पन्न होतो. हिंदू तत्त्वज्ञानातल्या ६मुख्य विचारप्रवाहांपैकी एक म्हणजे "योगमार्ग". मोक्षप्राप्तीसाठी हिंदू धर्मानं सांगितलेल्या कर्म-भक्ती-ज्ञान इ. मार्गांपैकी हा एक. आत्म्याचं परमात्म्याशी मीलन घडवून आणणं, स्वतःचं खरं स्वरूप ओळखणं, मोक्षप्राप्ती हा त्याचा गाभा. एवढी डोईजड होणारी भाषा बाजूला ठेवली तरी ह्या जगातल्या सुख-दुःखापासून विरक्ती मिळवणं यात अपेक्षित असावं असं म्हणता येईल. योगासनं, योगमुद्रा, प्राणायाम, ध्यान-धारणा इ. सर्व त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग आहेत.
हिंदू धर्माच्या वाङ्मयात ह्याविषयी काही खूप सुंदर resources आहेत. उदाहरणार्थ, गीतेच्या सहाव्या अध्यायात श्रीकृष्णानं अर्जुनाला योग्याची लक्षणं सविस्तर सांगितलेली आढळतात. पतंजलीनं योगसूत्रात शिस्तबद्ध पद्धतीने योगमार्गावर विवेचन केलेलं आहे. "अष्टांग योगा"चं मूळ तिथं आहे. यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-धारणा-ध्यान-समाधी ही ती आठ अंगं. (हे आपण शाळेत शिकलो होतो की काय असं मला हे लिहिताना वाटतंय! अर्थात तेव्हा ह्यातलं ओ की ठो समजत नसतं हा भाग वेगळा.) स्वामी विवेकानंदांनीपण "राजयोगा"वर (हेही अष्टांग योगाचंच दुसरं नाव) चर्चा केलेली आहे. इतकंच काय, आपल्या सर्वांना माहीत असलेल्या बी.के.एस. अय्यंगार यांनीसुद्धा योगमार्गाचं सार त्यांच्या "योगदीपिका" ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेलं आहे.
हे सगळं साहित्य मीही १००% वाचलेलं नाही. पण वेळ मिळेल तसं वाचणार आहे, because I learn best through reading and discussing what I read with someone. मुळात मी धार्मिक नाही, त्यामुळे मोक्षप्राप्ती, आत्मा-परमात्मा वगैरे संकल्पना माझ्यासारखीला चांगल्याच जड आहेत. पण आपल्याकडचे सहज available असलेले योगमार्ग किंवा तत्सम resources वापरून निदान आपलं रोजचं आयुष्य सुकर करता येण्याइतपत काहीतरी शिकता आलं तरी उत्तम आहे, right?!
आपण जे धावपळीचं आयुष्य जगतो त्यात थोडंसं slow down व्हायला, स्वतःकडे आणि आपल्या माणसांकडे लक्ष द्यायला मनाला शांतता लागते. योगमार्गातल्या ध्यान-धारणेच्या थोड्या अवघड गोष्टी बाजूला ठेवल्या, तरी फक्त योगासनं नियमितपणे करण्यानंसुद्धा ही शांतता आपल्याला मिळू शकते. जिममध्ये जाऊन मोठ्या आवाजातली गाणी ऐकत fast-paced cardio workout करणं मलाही आवडतंच, पण योगासनं करताना शरीराचा तोल जाऊ नये म्हणून जे भान ठेवावं लागतं तशी एकाग्रता इतर activities मधून फार कमीवेळा साधते. त्यामुळं I highly recommend, की जे-जे fast-life जगतात (मीपण त्यातलीच आहे!) त्यांनी slow-down होण्याकरता, stress चे परिणाम कमी करण्याकरता नक्की योगासनं करावीत. झाला तर फायदाच होणार आहे... तन्मयीला होतोय तसा!
ता.क. - स्क्रीनच्या खालच्या ↓ बाजूला "Contact Me" 💬 चं बटन मी नव्यानं add केलेलं आहे. ज्यांना ज्यांना माझ्या लिखाणावर प्रतिक्रिया द्याव्याश्या वाटतात, पण public comments सोडू नये असं वाटतं त्यांनी नक्की ह्या facility चा वापर करा. किंवा मला WhatsApp वर मेसेज सोडलात तरी चालेल. मला वाचायला नक्की आवडेल! आणि हो, ब्लॉग share करायला विसरू नका! 😊
Surekh mahiti ga...Yog kiti goshtit kiti parinamkarak ahe he chhan sangitle ahes.
ReplyDelete