चाकोरीबाहेरचं जग
मागं एका ब्लॉगपोस्टमध्ये मी म्हणाले होते की मी खूप पॉडकास्टस ऐकते. खासकरून ऑफिसला जाता-येताना. तर असंच एकदा मला "विश्वसंवाद" नावाच्या मराठी पॉडकास्टबद्दल फेसबुकवर माहिती मिळाली. अनोख्या गोष्टी करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींची मुलाखत हा या पॉडकास्टचा विषय. इतके दिवस पॉडकास्टस ऐकतेय पण असं innovative मराठी पॉडकास्टही अस्तित्वात आहे हे मला माहित नसल्याचं जरा आश्चर्यच वाटलं, आणि मी लगेच विश्वसंवाद ऐकायला सुरुवात केली.
त्याचे जुने जुने भाग ऐकत जाताना मला यशोदा वाकणकर यांची मुलाखत ऐकायला मिळाली. त्या स्वतः एपिलेप्सीच्या रुग्ण होत्या. "होत्या", कारण आता she is seizure-free since many years. परंतु त्या पुण्यात एपिलेप्सीचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपल्या "संवेदना फौंडेशन"मार्फत support groups चालवतात आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एपिलेप्सीच्या रुग्णांसोबत काम करतात. ती मुलाखत ऐकून मी inspire होऊन आणखी माहिती मिळवायला लागले, आणि पुण्यातल्याच एका न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टरांनी लिहिलेलं "Yoga for Epilepsy" वरचं लिखाण वाचनात आलं. Through the power of Google, मी ह्याविषयी आणखीन शोध घेत गेले आणि २-३ पुस्तकं हाती लागली तशी मी ती विकत घेऊन, त्या लेखकांचे YouTube videos बघून तन्मयीसाठी योगासनं सुरु केली. तिला त्यातून झालेल्या फायद्याविषयी मी आधीच सांगितलंय.
खरंतर यशोदा वाकणकरांशी किंवा त्यांच्या कामाशी माझा संबंध येण्याचं काहीही कारण नव्हतं. पण तो आला. विश्वसंवादसारख्या अनोख्या पॉडकास्टमुळे आला. आणि माझ्या डोक्यात मात्र वेगळीच चक्र फिरायला लागली...
नीट पाहायला गेलं तर आपल्याच आजूबाजूला असं चाकोरीबाहेरचं काहीतरी करणारी माणसं आपल्याला खूप दिसतील. वेगळा विचार करणारी, करियरच्या वेगळ्या वाट चोखाळणारी, निरनिराळे छंद जपणारी अशी कित्येक. माझ्या ओळखीतल्या अश्या काहीजणांच्या कामाविषयी मला अनेकदा कुतूहल वाटत आलंय. माझ्या ब्लॉगच्या निमित्तानं मी त्याला एक वेगळी वाट देण्याचं ठरवलंय. अशाच काही आपल्यातल्याच, पण नेहमी ऐकायला मिळतं त्यापेक्षा वेगळं काहीतरी करणाऱ्या माझ्याच ओळखीतल्या काही व्यक्तींशी गप्पा मारून, त्यांच्या कामाविषयी जाणून घेऊन ते ब्लॉगच्या माध्यमातून मांडायचं ठरवलंय.
अशाप्रकारचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तन्मयीची योगासनं घेण्याची कल्पना मुळात ज्यांच्यामुळे माझ्या, आणि पर्यायाने तन्मयीच्या, दिनचर्येचा मोठा भाग झाली त्या विश्वसंवाद पॉडकास्ट चालवणाऱ्या श्री. मंदार कुलकर्णी ह्यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टींनी मी याची सुरुवात करतेय. लवकरच त्या गप्पांची एक झलक पुढच्या ब्लॉगपोस्टमध्ये publish करेन. तोवर टाटा-बाय बाय...!

Comments
Post a Comment