तन्मयीच्या एपिलेप्सीचं निदान गेल्या वर्षी फेब्रुवारीत झालं होतं. तेव्हा तिला १३-१५ मिनिटं सलग seizures व्हायचे. औषधं सुरु करून त्यांचा परिणाम थोडा दिसायला लागेपर्यंत we were on our own. Seizures होताना ती बेशुद्ध जरी होत नसली तर एकप्रकारची तंद्री लागल्यासारखी व्हायची तिची. ते होऊन गेल्यावर ती जेव्हा भानावर यायची तेव्हा घाबरल्यासारखी दिसायची. So असंच एकदा कधीतरी तिला seizures होत असताना माझ्या मनात आलं आणि तिला मांडीवर घेऊन तिच्या आवडीचं शांत instrumental music लावून मी दीर्घ श्वसन सुरु केलं. तिला दिवसातून २५-३० वेळा तरी seizures होत होते तेव्हा! जवळपास प्रत्येकवेळी तिला छातीशी धरून किंवा मांडीवर घेऊन ती घाबरणार नाही याची दक्षता घेत आमच्यापैकी ज्यानं कुणी तिला घेतलं असेल तो दीर्घ श्वसन करत असे. असंच मग कधीतरी आमच्यापैकी कुणाच्यातरी लक्षात आलं की seizures थांबल्यानंतर तन्मयी स्वतःच्या श्वासांची लय आमच्या श्वासांच्या लयीशी मिळवू लागली आहे. तन्मयीची स्वनियंत्रित हालचाल (voluntary movement) त्या काळात जवळपास शून्यावर आली होती. त्यामुळे ही आमच्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट होती. I took this as a sign that Tanmayee is very much on the path to learning to be in sync with her own body. तिला वेळ लागेल, पण आपण मदत केली तर जमेल.
तन्मयीच्या development साठी काहीही नवीन try करायला मला छोटंसं निमित्त पुरतं. त्यामुळं हे लक्षात आल्यावर प्राणायाम आणि एपिलेप्सी, योगासनं आणि एपिलेप्सी या विषयावर मिळेल ते वाचायला मी सुरुवात केली. त्यातच सोनिया सुमर हिचं "Yoga for the Special Child" हे पुस्तक वाचनात आलं. १९७२ साली ह्या ब्राझीलमधल्या बाईनं स्वतःच्या Down Syndrome असलेल्या मुलीला तिच्या कलाने घेत योगासनं शिकवायला सुरुवात केली. वयाच्या ७व्या वर्षापर्यंत तिच्या मुलीचा muscle tone, फुफुसांची कार्यक्षमता, एकाग्रता या सगळ्यात उत्तम फरक पडला! तेव्हापासून ती तिला जिथं बोलावतील तिथं जाऊन असे special needs योगासनांचे वर्कशॉप्स घ्यायला लागली. आणि मग काही काळानं तिनं हे पुस्तक लिहिलं, ज्यात प्रत्येक आसन अशा special needs असलेल्या मुलांकडून कसं करून घ्यावं याची चित्रांसहित माहिती दिलेली आहे.
तन्मयीप्रमाणे neurological disorders ज्यांना आहेत अशा मुलांना बरेचदा स्वनियंत्रित हालचाली करता येत नाहीत... अगदी तान्ह्या बाळांप्रमाणे. बाळांचे हात-पाय-अंग घट्ट होण्यापूर्वी, म्हणजेच त्यांचा muscle tone build होण्यापूर्वी त्यांच्या हालचाली जशा असतात तशाच ह्या मुलांच्या असतात... अगदी वयाच्या ५व्या-६व्या वर्षापर्यंतसुद्धा. सांगितलं तर खोटं वाटेल पण ह्या सर्व गोष्टी १००% आपला मेंदू कंट्रोल करत असतो. उद्या मेंदूनं ठरवलं की आजपासून आपल्या शरीरात शून्य muscle tone राहील, तर खरंच तसं होऊ शकतं. (पॅरालीसीस सारख्या आजारात तरी वेगळं काय होतं!). शेवटी तन्मयीच्या मेंदूला हे सगळं करायला शिकायचं होतं/आहे. आणि तिच्या मेंदूपर्यंतचा मार्ग तिच्या शरीरातूनच आहे हे पक्कं ठाऊक असल्यामुळे या पुस्तकाचा वापर करून तिच्या स्नायूंना बळकटी यावी, तिची एकाग्रता वाढावी आणि एकूणच तिला स्वतःच्या अवयवांचं/शरीराचं भान यावं यासाठी मी तिची योगासनं घ्यायला लागले.
मूल अगदी तान्हं असल्यापासून, किंवा जी मुलं वयानं मोठी असली तरी ज्यांचं शरीर/मेंदू तान्ह्या बाळाप्रमाणे आहे अशा मुलांसाठी करण्याची आसनं या पुस्तकात वेगळी दिलेली आहेत. ज्यांना प्रचंड प्रमाणात physical/mental/learning/behavioural असे developmental challenges आहेत अशा सर्व बाळांना/मुलांना यातल्या आसनांनी काही ना काही फायदा नक्कीच होऊ शकतो.
तन्मयी आता योगासनांनी चांगलीच सरावली असली तरी त्या पुस्तकात दिलेली अगदी basic level ची सुद्धा सगळी आसनं अजून नाही करता येत तिला. अजून तिच्या हालचाली स्वनियंत्रित नसल्यामुळे ती "आसनं करते" असं न म्हणता तिच्याकडून आम्ही आसनं "करून घेतो" असं म्हणणं जास्त योग्य आहे. आसनात शिरताना तिला तिच्या अवयवांची तोंडओळख आम्ही सतत करून देत आलोय. त्यामुळेच की काय, पण ती आता हात-पाय-पाठ-मान-डोकं-दीर्घ श्वास असे सगळे शब्द ऐकून, ओळखून, त्यांना दाद देत योग्य तो अवयव हलवायचा प्रयत्न करताना आम्हाला दिसते आहे. She still has a long way to go, but she has also come such a long way. ती सध्या कोणकोणती आसनं करते त्याचे काही फोटो मी इथे टाकतेय...याखेरीच पालथं पडून हातांवर जोर देऊन भुजंगासनसुद्धा ती खूप छान करते, पण तिची मान stable ठेवायला त्यात आसनं करून घेणाऱ्याची involvement लागते, त्यामुळे मी त्याचा फोटो नाही काढू शकले. I hope अजून वर्षभरानं मी जेव्हा ह्या पोस्टकडे वळून पाहीन तेव्हा तन्मयी आणखीन ४ नवीन आसनं शिकलेली असेल.
"Yoga is a light, which once lit, will never dim. The better your practice, the brighter the flame."
- B.K.S.Iyengar
|
पवनमुक्तासन |
|
Spinal Twist - to be done with extreme caution. |
|
उभं राहून करायच्या वृक्षासनाचं तन्मयीसाठी केलेलं variation. |
|
Spinal Twist - to be done with extreme caution. |
|
Bridge - this helps with hamstring muscles |
|
Leg Raise - also helps with hamstring muscle |
|
Leg Raise - also helps with hamstring muscle |
|
Weight bearing on Hands with Elbows Locked - this helps shoulder and wrist joints |
|
पश्चिमोत्तानासन |
|
स्वतःच्या पावलांची ओळख करून घेताना. उताणं पडून इतर मुलांसारखे स्वतःच्या पायांचे अंगठे तोंडात घालायला ती कधीच गेली नाही. म्हणून खास तिच्यासाठी ही पश्चिमोत्तानासनाची variety! |
|
Child Pose - this is the ultimate relaxing pose. Tanmayee does this after she is done with all other poses. |
Amazing that you make it work.
ReplyDeleteVery impressive.....Tanmayee u do each aasana extremely well
ReplyDeleteतिला पण गाणं शिकव
ReplyDelete