धीर धरी!

कधीतरी असं होतं, की एखादी घटना आपलं सरळधोपट आयुष्य उलटं-पालटं करून टाकते. त्या प्रसंगानंतर आपण इतके बदलतो की कधी कधी स्वत:चंच नवल वाटतं. त्या कठीण प्रसंगात येणारे स्वत:चेच अनुभव आधीच्या आपल्या स्वभावाच्या साच्यात बसेनासे होतात. तन्मयीच्या एकंदरीत diagnosis नंतर माझं काहीसं असंच झालंय्. म्हणजे अगदी “आधीची मी” आणि “नंतरची मी” असा फरक नसला तरी काही स्वभावातल्या काही हळव्या जागा आता तितक्याशा हळव्या राहिलेल्या नाहीत हे जाणवतं. भावनाप्रधान मी खूप आधीपासून आहे. मला जवळून ओळखतात त्यांना ते खूपच चांगलं माहीतेय्. पण आधी होते तशी emotional fool मात्र आता नाही. स्वत:च्या आणि आसपासच्या माणसांच्या मला उमगणाऱ्या भावनांकडे शांतपणे पाहण्याची क्षमता आता माझ्यात निर्माण होतेय् असं जाणवतं. कधीतरी स्वत:च्या भावनांमधे क्षणिक वाहूनही जाते मी... विशेषतः रोहितशी भांडण असलं की तर जास्तच...मग डोळे सुजेपर्यंत रडणं वगैरे ओघानं येतंच... असो. पण त्यातून सावरल्यावर स्वत:च्या भावनांकडे शांतपणे पाहणं, त्या जशा आहेत तशा, without judgement, acknowledge करणं हे तसं जमायला लागलंय्.

कारण काय झालं, तर साधारण एक-दीड वर्षापूर्वी तन्मयीची तब्येत अगदी अजिबात stable नव्हती. तिला सतत उलट्या व्हायच्या, १०-१२ मिनिटांचे seizures चे clusters तर सतत राशीला होते, तिचं वजन वाढत नव्हतं, एक ना दोन. ते २-३ महिने आमच्यापाशी इतर कुणी नव्हतं म्हणून मी ॲाफिसला सुट्टी टाकून घरी होते. दिवसा रोहित नोकरीला जायचा आणि मी तन्मयीसोबत एकटी घरी. तिला साधं फिरवायलाही नेऊ शकत नव्हते बाहेर अशी अवस्था. त्या काळात तन्मयीचं अन्न उलटून काढणं इतक्या जास्त प्रमाणात होतं की त्याची मला नकळत भीती बसली. इतकी, की नंतर माझी आई आमच्याकडे आल्यावर किंवा रोहित घरी असला तर मी अक्षरश: बेडरूम मध्ये जाऊन बसायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही तन्मयीला जेवण भरवा. आपल्याला असं काही होतंय हे समजायला वेळ गेला... तन्मयीला आता उलटी होणार अशी चिन्ह दिसायला लागली तरी हातपाय गळून जायचे आणि काय करावं ते कळायचं नाही. कधीकधी प्रसंग निभावून नेला तरी नंतर तिला स्वच्छ करून बाजूला ठेवून आपण दुसऱ्या खोलीत जाऊन  रडणे अशाही वेळा आल्या. एका मैत्रिणीशी हे discuss करताना हळू हळू डोक्यात tube पेटत गेली की आपण तन्मयीत involve होताना स्वतःच्या भावना आहेत हेच विसरतोय. त्यात वाहून जातोय. आणि तन्मयीच्या condition मुळे आपल्याला त्यातून सावरायला धड वेळही मिळत नाहीये. आपला स्वभाव मुळातच भावनाप्रधान असल्यानं झाल्या घटनेतून सावरण्यासाठी स्वतःच्या मनालाही अधून मधून गोंजारणं ही आपली गरज आहे. आता तन्मयीच्या केवळ असण्यामुळे ती आपणच पूर्ण करत नाही हे असं दीर्घ काळासाठी sustainable नाही असू शकत.

मग हळू हळू self-care ला महत्त्व द्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करून आपल्याला काय suite होतंय ते पाहिलं. व्यायामाचं routine मागे लावून घेतलं. गाणं सुरु केलं. घरातल्या गोष्टींना शक्य तितकी शिस्त आणण्यावर भर दिला. त्यामुळे मनालाही आपोआपच शिस्त लागली. आणि आताशा स्वतःला काही कारणानं अस्वस्थ वाटू लागलं की relatively पटकन मी स्वतः ते ओळखून काढू शकते. समजत नसेल तर स्वतःच्या बाबतीत patience दाखवते. वेळ देते. तरी नाही जमलं तर रोहित सोडून हक्काच्या किमान चार-पाच व्यक्ती माझ्यापाशी आहेत ज्यांच्याशी मी मनातलं बोलून गोष्टी सोडवते.

या सगळ्या process मधून जात असताना एका विचारानं मनात घर केलं, की दुःख (आपल्याकडे एखादी गोष्ट नाही असं वाटून होणारं),  self-victimization (स्वतः:ला उपेक्षित/दुर्दैवी/परिस्थितीनं गांजलेला समजणे), अपराधी भावना, आणि इतरांसाठी empathy (सहसंवेदना) हे एक विचित्र वर्तुळ आहे ज्यात मी सध्या सतत फिरत असते. या कोविड-१९ च्या काळात, वेगवेगळ्या ठिकाणी लॉक डाउन सुरु झाले, सोसायट्या सील झाल्या, लोक घरात अडकले...  अनेकांना त्यापायी अनंत अडचणी येतायत तर काहीजण उन्हाळ्याच्या सुट्टीप्रमाणे झाल्या लॉक डाउनची मजा घेऊ शकतायत. वरकरणी परस्परविरोधी वाटणारे हे perspectives ऐकताना, social media वर वाचताना, मनात सतत मी दीड वर्षांपूर्वी घरात कसे दिवस काढले त्याच्याशी तुलना होत राहते. जे सध्या सुट्टीची खरोखरच मजा लुटतायत ते पाहून आपल्याला तशी सुट्टी का मिळत नाही याचं दुःख होतं. इतरांशी बोलताना कधीकधी चटकन स्वतःला victimize ही केलं जातं. मग तन्मयी आठवते, आधी ऐकलेल्या-पाहिलेल्या इतरांच्या कठीण अनुभवांची आठवण होते, आणि आपण कुठे self-victimize करत बसलो याबद्दल guilty वाटतं. आणि मग वरकरणी आपल्यापेक्षा सुदैवी आहेत असे वाटणाऱ्यांच्या difficulties बद्दलही empathy वाटू लागते, त्यांच्या छोट्या छोट्या वेदनाही कशा त्यांच्यासाठी मोठ्या असू शकतात हे लख्ख दिसायला लागतं. मनावरचं मळभ दूर होतं. पुन्हा काहीतरी वेगळा प्रसंग घडला की परत हीच cycle. बरेचजण मला म्हणतात की मी strong आहे, एवढं सर्व manage करते वगैरे.. पण स्वतःबद्दल कधी क्वचित दुर्दैवी असल्याचं feeling येतं तेव्हा समजत नाही की खरंच मी strong आहे का. Strong असले तर अशा भावना कशा येतील नं मनात? शेवटी empathy वर येऊन मी थांबते हीच त्या so-called strength ची खूण असेल का? काय गोंधळ आहे विचारांचा!

Well, हा blog लिहायला सुरुवातच मुळी अशा मनातल्या गोंधळामुळे केली होती... त्यामुळे लिहीत राहणे आणि स्वतःच्या बाबतीत patience दाखवणे हेच सध्यातरी बेस्ट म्हणायचं.









Comments

Contact Me

Name

Email *

Message *