Normality Bias

Scene one (talking on the phone with a friend)-
"तन्मयी काय म्हणतेय? आता रांगत असेल नं?"
"नाही अजून."
"का बरं?"
"तिला developmental delays आहेत. अजून ती मानही धरत नाहीये. आता डॉक्टरकडे नेऊ म्हणजे समजेल काय झालंय ते."
"Oh... तुम्ही मालिश नाही का करत तिला?"

Scene two (a day after scene 1)-

बहिणीच्या घरी. खूप गडबड गोंधळ. तिची धाकटी मुलगी, तन्मयीपेक्षा ३ महिन्यांनी लहान, rocker मध्ये खेळतेय मस्त. तिचे सासू-सासरेपण आहेत. तन्मयी खूप गोंधळलेली आहे आणि रोहित, मी आणि आई तिला manage करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. ती काही केल्या खाली खेळायलाच तयार नाहीये. खाली ठेवलं की रडून दंगा घालतेय. 
बहिणीच्या सासूबाई (ज्या रोहितला आज प्रथमच भेटतायत): काsssय; खाली राहातच नाही का हीsss?
रोहित (already irritated): हूं!

Scene three (a week or two after scene 2)-

रोहित आणि मी तन्मयीला घेऊन एका मित्राकडे गेलोय. त्या मित्राचा मुलगा तन्मयीएवढाच आहे. नवीन जागी गेल्यावर तन्मयी गोंधळते हे आम्ही एव्हाना चांगलंच ओळखलेलं आहे. त्यानुसार आम्ही तिला हळूच car seat मधून काढतो आणि जवळ घेतो, पण शेवटी ती घालायचा तो गोंधळ घालतेच. 
मित्राची सासू (आज पहिलीच भेट. ओळखपरेड झाल्यावर तन्मयीकडे बघून): तुम्ही मालिश नाही का करत हिला (म्हणजे तन्मयीला)?
रोहित ('कहर आहे' असा चेहरा करून): करतो. 

When that which is "normal" stopped applying to my situation, my kid, I began to realize just how much each and every one of us has been taking normality for granted. People's questions in above scenarios also assume normality in fundamental child development.


I am not really a dreamer. In our marriage, Rohit has been the dreamer while I prefer to live in the "real world". Often, he thinks of wild things we could do with our lives and I do the job of bringing him back to reality. There was a point when I did realize the power of his dreaming. His wild ideas are the reason we are living the life we have right now. 


पण स्वभावाला औषध नाही. तन्मयी पोटात असतानासुद्धा तोच जास्त स्वप्नरंजन करायचा. तन्मयीसोबत काय काय धमाल करता येईल, तिला कसं वाढवायचं हा सगळा पुढचा विचार तोच जास्त करायचा. माझी भूमिका श्रोत्याचीच होती. म्हणजे त्या विषयात माझी मतं नव्हती असं नाही, पण इतका पुढचा विचार करणंच मुळात जमत नसल्यामुळे तसं होत असावं. आणि इतक्या वर्षांत त्याचं तसं स्वप्नरंजनही खूप enjoy करायला शिकलेय मी. 


तन्मयीचे developmental delays जसजसे ढळढळीत सूर्यासारखे आम्हाला स्पष्ट दिसायला लागले तसतसं मला जाणवत गेलं की आम्ही केलेलं स्वप्नरंजन हे तिच्या ठराविक development ला गृहीत धरून केलेलं होतं. म्हणजे ती वयाच्या ३ऱ्या महिन्यापर्यंत मान धरायला लागेल, सहाव्या महिन्यात पालथी पडेल, ह्या इतक्या बेसिक गोष्टी आमच्या खिजगणतीतही नव्हत्या. ते काय सगळीच मुलं करतात, तन्मयीपण करेलच हाच subconscious level ला विचार. आमच्या पिल्लाचा वाढीचा वेग किंवा track च वेगळा असू शकतो हे गावीही नव्हतं. किंबहुना आमच्या तिच्यासोबत "धमाल" करण्याच्या संकल्पनाही किती साच्यातल्या होत्या हेसुद्धा नंतरच जाणवायला लागलं. 


आधी धक्का बसला. पण मग लक्षात आलं की ironically, such a reaction is also "normal" in its own way. Because there is a thing called "Normalcy Bias" or "Normality Bias". We are not aware of it in our daily lives. It causes us to underestimate the possibility and the extent of damage caused by disaster (or mundane bad things) because we have a bias to believe that things will always function the way they normally function. So when non-normal things do happen, it causes feelings of denial and anger in us. Most of us do not know how to react to those feelings while our assumption of normality is being constantly challenged. 


माझ्या बहिणीची सासू, किंवा मित्राची सासू ह्यांच्या बाबतीत हेच तर झालं! आमची गोष्टही फार वेगळी नव्हती. रोहित आणि मी त्या काळात एकमेकांशी जितके कमी बोललो आणि जसे वागलो तसे पूर्वी कधीच वागलो नव्हतो. non-normal घटनेला आम्ही non-normal पद्धतीनेच react होत होतो. 


ह्यादरम्यान एक गोष्ट आम्हा दोघांनीही चालू ठेवली होती, ती म्हणजे वाचन. Anybody who knows us knows how much we love to read, and how we actively work on reading new books. I am glad that we found solace in books during this tough period. Because it was one of the books I read which offered a perspective that helped me come to terms with the situation better than any person could have. 


That book is "The Gene: An Intimate History" by Dr. Siddhartha Mukherjee. The book introduced the idea of a "wild type" to me. In the gene-world, the opposite of "non-normal" is not "normal," but "wild type" - i.e. the phenomena that are commonly observed "in the wild" - and that sometimes the non-normal can become wild type over time. 


For example, a blond child being born to Indian parents will be non-normal because that is not the "wild type" for Indian race. But it is the wild type in Europe, so it will not be considered abnormal there. However, if Indians and blond Europeans were to marry each other, in a few generations blond hair will also be one of the wild types observed in India. In short, normality is relative and changeable.


ही गोष्ट माझ्या डोक्यात इतकी फिट्ट बसली की विचारता सोय नाही! It helped me shed some of my normality bias, and that was the moment when I knew I was 100% ready for a new normal with regards to Tanmayee's developmental track and the lifestyle changes that come with it.

Comments

Contact Me

Name

Email *

Message *