अमेरिकेबद्दलचे १० गैरसमज

मी अमेरिकेत प्रथम आले ते कॉलेजला असताना. २००४ ते २०१० इथं राहिले आणि भारतात परत गेले कारण मला स्वतःला अमेरिका खास आवडत नव्हती. पण २०१२ ला लग्न झाल्यावर काही वर्षांनी परत इथं आले. ह्या दोन्ही phases मध्ये मला जे-जे अनुभव येत गेले त्यातून माझे स्वतःचे बरेचसे चुकीचे समज दूर होत गेले. त्यातून मला जी अमेरिका उलगडत गेली, ते थोडंसं share करते...

अमेरिका आणि अमेरिकी लोकांबद्दलचे १० गैरसमज:

१. अमेरिकेत खूप थंडी असते. 
साफ चूक. अमेरिकेच्या उत्तर आणि उत्तर-पूर्व भागात हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते व उन्हाळ्यात खूप उकाडा आणि पुष्कळदा पाऊससुद्धा. दक्षिणेकडे तर उन्हाळ्यात रणरणतं ऊन असतं आणि पश्चिमोत्तर भागात सदैव ढगाळ हवामान.

२. इथे कुटुंबाला अथवा कुटुंबव्यवस्थेला महत्त्व नाही. 
Well, अमेरिकेत मुलं साधारण १६-१८ वर्षांची झाली की त्यांनी ठराविक बाबतीत स्वतंत्र होणं अपेक्षित असतं, जसं की स्वतःचं कॉलेज-शिक्षण स्वतः पैसे भरून/कर्ज काढून पूर्ण करणे, किंवा स्वतःच्या लग्नात थोडी तरी आर्थिक जबाबदारी उचलणे. पण याचा असा अर्थ मुळीच नव्हे की इथले लोक कुटुंबाला धरून नसतात. In fact आपापल्या कुटुंबीयांबद्दल, आपल्या आई-वडिलांबद्दल आधी एक माणूस म्हणून विचार केला जातो आणि मग नातेवाईक म्हणून. त्यामुळे माझ्या अनुभवानुसार इथल्या लोकांना आपल्या घरच्यांबद्दल जास्त कळवळा असतो, आणि त्याचबरोबरीने घरच्यांच्या गुण-दोषांकडे समभावाने पाहण्याचा दृष्टिकोनही.

३. अमेरिकेत खूप श्रीमंती आहे. 
Not always true. अमेरिका एक देश म्हणून सर्वसाधारणपणे भारतापेक्षा श्रीमंत आहे यात वाद नाही. पण इथं अनेकजण २-३ part time नोकऱ्या करून स्वतःची आणि घरच्यांची पोटं भारतात. अमेरिकेत बेघर आणि बेरोजगार असण्यासारखा दुसरा शाप नाही. बेघर असलात तर थंडीनं जीव जाण्याची भीती. आणि बेरोजगार असलात तर इन्शुरन्स नसतो, परिणामी आरोग्यविषयक सुविधा परवडत नाहीत. आपण श्रीमंती बघतो कारण majority of the times आपल्याकडचे फक्त उच्चशिक्षित लोक इथं राहतात, आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या असल्यानं त्यांचं राहणीमानही तसं उत्तम असतं. २०१७ च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत साधारण ५ ते ६ लाख लोक बेघर आहेत, त्यापैकी जवळपास ७५,००० लोक न्यूयॉर्कमध्ये आहेत. अमेरिकेसारख्या देशाच्या मानाने तो मोठा आकडा आहे.

४. न्यूयॉर्क,वॉशिंग्टन डी. सी., नायागरा फॉल्स, लास व्हेगस आणि कॅलिफोर्निया पाहिलं की झालं यूएसए फिरून; आहे काय त्यात! 
यासारखा दुसरा गैरसमज नाही. ह्यापलीकडे अमेरिकेत अनेक वैविध्यपूर्ण संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य आहे. अलास्कासारखी untouched जागा ते फ्लोरिडामधलं की वेस्टसारखं ठिकाण हेही तितकंच worth the visit आहे. अनेक नॅशनल पार्क्स, स्टेट पार्क्स आणि बॉस्टन-सिएटल-शिकागोसारखी शहरं जाऊन पाहिली की अमेरिकेतलं खरं वैविध्य समजतं. भारतातल्या प्रत्येक राज्याला जसं स्वतःचं असं खास व्यक्तिमत्व आहे तसंच इथल्याही प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्यपूर्ण असं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. गरज आहे ती जाऊन ते अनुभवण्याची.

५. अमेरिका ही Friends/How I Met Your Mother (पार्टीकल्चर) किँवा Breaking Bad/Orange Is the New Black (गुन्हेगारी/gun-violence) मध्ये दाखवतात तशीच आहे. 
अर्थातच नाही! आपल्याकडच्या टीव्ही सिरियल्समध्ये दाखवतात तशी कुटुंबं आपली तरी कुठे असतात? शेवटी ते टीव्ही शोज आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे.

६. अमेरिकेत सगळे पिझ्झा-बर्गरच खातात. 
अजिबात नाही! हं, हे खरंय की दिवसा बाहेर जेवणाऱ्यांची (lunch) संख्या इथं खूप आहे. पण रात्री घरच्यांबरोबर जेवण करण्यालासुद्धा तितकंच महत्व दिलं जातं. खासकरून ज्या घरांमध्ये लहान मुलं वाढतायत तिथं तर नक्कीच.

७. अमेरिकन शाळांमध्ये कधी गोळीबार होईल सांगता येत नाही. 
गेल्या वर्षभरात शाळांमध्ये होणाऱ्या गोळीबारात वाढ झाली असली तरी रोजच्या रोज घडणारी ही घटना नाही.

८. अमेरिकेत लोक सार्वजनिक ठिकाणी कचरा करत नाहीत. 
भारताच्या मानाने खरंच अमेरिकेतले लोक सार्वजनिक शिस्त जास्त पाळतात. अगदी १००% खरंय. पण बरेचसे महाभाग इथंही आहेत जे कोल्डड्रिंकच्या बाटल्या किंवा कधीकधी तर सिगरेटी फुंकून जळतं थोटूक चालत्या गाडीच्या काचेतून बाहेर फेकतात.

९. अमेरिकन्स शारीरिक संबंध आणि लग्नाच्या बाबतीत अतिशय (टोकाच्या) मोकळ्या विचारांचे आहेत. 
असं मुळीच नाही. प्रत्येक देशात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असतात. त्यामुळे याबाबतीतही खूप liberal लोकांप्रमाणेच अगदी conservative विचार करणारेदेखील आहेत. भारतातही सुशिक्षित मुलं-मुली हल्ली उशीरा लग्न करतात, पण इथं मात्र २१-२२व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुला-मुलींची संख्या अगदीच नगण्य नाही.

१०. अमेरिकन्स अतिशय स्वार्थी लोक असतात. 
हे बोलताना बहुतेकवेळा अमेरिकेच्या संधिसाधू परराष्ट्रधोरणाकडे बोट दाखवलं जातं. पण हे करताना आपण २ गोष्टी विसरता काम नये - एक म्हणजे एखाद्या देशाचं परराष्ट्रधोरण आणि त्या देशातल्या सामान्य माणसाची वागणूक याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. अमेरिकन्स हे अतिशय friendly आणि मोकळीढाकळी वर्तणूक असलेले लोक आहेत. Informal, quite unlike Europeans. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही देशाचं परराष्ट्रधोरण हे इतर देशांच्या प्रगतीसाठी नसतंच! प्रत्येक देश आपापला स्वार्थ साधण्यासाठी उत्सुक असतो.



Comments

  1. Wonderful...every person who has views without knowing the real scenario should read this blog. I too had some of the misconceptions that you mentioned :D

    ReplyDelete
  2. Good to know another perspective....

    ReplyDelete

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *