चाकोरीबाहेरचं जग (भाग १): स्वान्त:सुखाय!

इंजिनिअर/डॉक्टर तर आजकाल सगळेच होतात. MBA कडेसुद्धा खूपजण वळतात. पण ते करता करता केवळ आवडीखातर B.A. English Literature सारखं शिक्षण घेणारे तसे कमीच. पुण्याच्या श्री. मंदार कुलकर्णी यांनी नेमकं हेच केलं. आणि तेही ८०च्या दशकात, जेव्हा केवळ आवडीखातर काहीतरी शिकणं ही संकल्पनाच अनेकांना shocking झाली असती. माझी त्यांच्याशी ओळख कशी झाली ते मी मागच्या पोस्टमध्ये लिहिलंच आहे. सॉफ्टवेअरमधलं करियर आणि 'विश्वसंवाद'सारखा creative उपक्रम हे दोन्ही एकत्र करताना त्यांची thought process काय असते, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती, त्यामुळे त्यांच्याशी याविषयी सविस्तर बोलण्याचं ठरवलं आणि तसं केलंही.

बोलताना पहिल्या काही मिनिटातच साहित्याकडे असलेला त्यांचा ओढा मला दिसून आला आणि केवळ त्या आवडीखातर साहित्यात रीतसर BA केलेलं असूनही त्यांनी "करियरसाठी मात्र सॉफ्टवेअरच का निवडलं?" हा प्रश्न मला पडल्याशिवाय राहिला नाही. पण मला वाटतं करियर निवडताना आपल्यापैकी बहुतेकजण जो उदरनिर्वाहाचा विचार करू तोच त्यांनीही त्यावेळी केला. ते म्हणतात की, "Already माझं इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर MBA असं दोन्ही झाल्यामुळे it was a natural progression from a job and career perspective." शिवाय तेव्हा, म्हणजे ८५-८८ च्या काळात liberal arts ना आता जितका scope आहे तितका काही नव्हता. BA त्यांनी केलं होतं ते स्वत:च्या आनंदासाठी, आणि "मजा येते वाचायला!" म्हणून. पण BA च्या basis वर करियर करायचं म्हणजे MA, M.Phil. पलीकडे जात आलं नसतं.  त्यामुळे "पुढे कशात करियर करायचं" ह्याची निवड त्यांच्यासाठी relatively सोपी होती.

त्यावेळच्या trend नुसार सॉफ्टवेअरमधलं काम मंदारना अमेरिकेत घेऊन गेलं. आणि ते कॅलिफोर्नियात स्थायिक झालेत. साधारण गेली २५-३० वर्षं सॉफ्टवेअर आणि Project Management मध्ये यशस्वी करियर घडवत असतानासुद्धा त्यांची साहित्याची, वाचनाची आवड काही कमी झाली नाही. आपल्याला ऐकताना "अरे! हे तर obvious आहे!" असं वाटायला लावणाऱ्या, पण पटकन कुणालाही सुचतीलच असं नाही अशा प्रकारच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यांचं पॉडकास्ट सुरु करण्यासाठी inspiration त्यांना इतर अनेक पॉडकास्ट ऐकूनच मिळालं. २०१४ च्या सुमारास त्यांनी स्वतः वेगवेगळे पॉडकास्टस ऐकायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की मराठीत असं एकही पॉडकास्ट नाही. वैविध्यपूर्ण विषय योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी वेगवेगळी माध्यमं वापरली जातात - पुस्तकं, वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही वगैरे - त्यापैकी मराठी भाषेतल्या माध्यमांत पॉडकास्ट येतच नाही. So पॉडकास्ट हे माध्यम आणि स्वत:ची गप्पा मारायची आवड यांची सांगड घालणं खूप सोपं होतं.

Concept कितीही सोपी वाटली तरी पुढे अडचणी होत्याच. म्हणजे पॉडकास्टींगसाठी लागणारी साधनं, तांत्रिक बाबी याविषयी मंदारना तशी काहीच माहिती नव्हती. कॅलिफोर्नियातल्या एका मराठी इंटरनेट रेडिओवर गप्पागोष्टींचा कार्यक्रम करण्याचा अनुभव आणि त्यातून कमावलेलं मुलाखती घेण्याचं skill  हे फक्त गाठीशी होतं. पण एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असली की आपण त्यासाठी हवा तितका वेळ देतो आणि लागतील तितक्या नवीन गोष्टी शिकून स्वतःच्या comfort zone च्या बाहेर जायला भीत नाही. त्यामुळे  विश्वसंवाद हा सध्या तसा "एकखांबी तंबू" (हेही मंदार यांचेच शब्द) असला तरी त्याकरता अथक काम करायचा त्यांना अजिबात कंटाळा नाही! पॉडकास्टसाठी मुलाखत घेणं हा खरंतर मंदार यांचा area of expertiseआहे. पण कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून हा उपक्रम चालवायचा असल्यामुळं त्यांना इतर गोष्टी शिकणं भाग होतं. याविषयी सांगताना मंदारनी जे "Agile" मधल्या "T shaped professional" ची संकल्पनेचं उदाहरण दिलं ते एखादी IT त काम करणारी व्यक्तीच देऊ शकते! सॉफ्टवेअरवाल्या लोकांना ती संकल्पना माहीत असेल. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या team मध्ये काम करताना तुम्ही "Jack of multiple things, and master of at least one" असं असलं पाहिजे. म्हणजे वेळ पडली तर आपलं नैपुण्य ज्यात आहे त्याबाहेरचं काम करता आलं पाहिजे. विश्वसंवादची team ही मंदारची एकट्याचीच असल्यामुळे मुलाखत घेण्याच्या पलीकडचंसुद्धा सर्व काही तेच सांभाळतात.म्हणजे अक्षरश: मुलाखतीसाठी नवनवीन व्यक्ती शोधण्यापासून ते प्रत्यक्ष एपिसोड एडिट करून तो publish करण्यापर्यंत सर्व काही ते स्वतःच करतात. त्यासाठी लागणारे एडिटिंग सॉफ्टवेअर किंवा इतर साधनांची माहिती घेऊन त्यांनी ते सर्व शिकून घेतलंय. हे सगळं काही एक full time job सांभाळून.

"विश्वसंवाद" हे पॉडकास्टचं नाव, त्याचं सुरुवातीला वाजणारं theme music, प्रत्येक एपिसोडची काहीतरी वेगळी सुरुवात (किंवा introduction) ह्या सगळ्याचा नीट विचार करून त्यांनी हे काम हातात घेतलं. विश्वसंवादचा विषय म्हणजे काहीतरी अनोखं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी लोकांशी गप्पागोष्टी. यात मग एक पोथ्या-पुराणांचं डिजिटायजेशन करणारे नाशिकमधले गृहस्थ आहेत, अमेरिकन सैन्यात असलेला एक मराठी तरुण आहे, एक गणिताचे शिक्षक आहेत आणि अस्खलित मराठी बोलणारा कीर्तनात Ph.D. केलेला एक फ्रेंच गृहस्थही आहे! कार्यक्रमाचा format खरोखरच casual गप्पागोष्टी असाच आहे. आणि ज्यांच्याशी संवाद साधायचा त्यांच्या कामातल्या human angle कडे मंदार यांचा जास्त ओढा आहे. म्हणजे त्या व्यक्तीने एखादा निर्णय का घेतला, त्यामागे काय विचार होता, त्यात त्यांना कुणाची मदत झाली किंवा झाली नाही, तो निर्णय कसा निभावला, त्यात काय अडचणी आल्या, त्या कशा सोडवल्या इ. इ.

मंदारच्या मते आपल्यापैकी बहुतेकांना आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण जे काही करतो ते का करतो हा विचार करण्यात कमी interest असतो. बऱ्याचदा आपण केवळ "सगळे करतात म्हणून" किंवा "अमुक एकानं सांगितलंय म्हणून" गोष्टी करत असतो. काही बाबतीत खूप विचार केला तर समोर येणारे पुढचे विचार हे आपल्याला uncomfortable करणारे असू शकतात या भीतीनं की काय पण आपण कोणत्याही गोष्टीच्या खोलात शिरण्यापासून सतत स्वतःला परावृत्त करत असतो. सतत काहीतरी "हलकं-फुलकं" पाहिजे, "entertainment" पाहिजे ह्या मताचे आपल्यापैकी बहुतेक सगळेचजण असतात. मंदारना असा विचार करण्याचं aversion तर नाहीच, पण खोलात शिरून विचार करणं in fact आवडतं. मला वाटतं, याच उत्सुकतेमुळे आणि एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याच्या स्वभावामुळे त्यांना इतक्या वेगवेगळ्या background च्या मराठी माणसांशी बोलणं आणि विश्वसंवादसाठी छोट्या-छोट्या विषयांवरही गप्पागोष्टी सहज रंगवणं शक्य होत असावं.

याच धर्तीवर "विश्वफोरम" नावाचा नवीन उपक्रम ते सुरु करताहेत. "Video conferencing वर आधारित global presentation platform" असा हा प्रयोग आहे. मंदार हे स्वतः पुण्यात वाढल्यामुळे वसंत व्याख्यानमाला, मॅजेस्टिक गप्पा, कवितावाचन यासारख्या (ज्याला मंदारनी "education + entertainment म्हणजे edutainment" असं नाव दिलंय) कार्यक्रमांविषयी त्यांच्या मनात एक soft-corner आहे. पण असे कार्यक्रम प्रत्यक्ष arrange करायचे म्हणजे त्यात येणाऱ्या practical अडचणीही त्यांना दिसतात. म्हणजे जसं ते म्हणतात की "एखादं व्याख्यान arrange केलं तर किती लोक ते ऐकायला येतील, शिवाय त्यासाठी हॉल घ्यायचा त्याचं भाडं ह्या सगळ्यामुळे प्रत्यक्ष असे कार्यक्रम organize करणं हे economically viable नाही." पण त्यांच्या full time job मध्ये वर्षानुवर्षं video conferencing चे सॉफ्टवेअर्स वापरले त्याचा वापर अश्या कार्यक्रमांसाठी करून तो content फुकटात श्रोत्यांना available करून देणं अशी कल्पना त्यांना सुचली. हेच ते "विश्वफोरम". सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु केलेलं असलं तरी त्यात कोणत्या प्रकारची "edutainment" सादर करायची याविषयी मंदारच्या डोक्यात अनेक कल्पना already शिजतायत. हे सगळं काही स्वतःला आवड आहे म्हणून - "स्वान्तःसुखाय" - करत असल्यामुळे मंदारचा याबाबतीतला उत्साह दांडगा आहे. कधीकधी अति होतंही, पण आवड असल्यामुळे झेपतं एवढं मात्र त्यांच्याशी बोलून मला नक्की जाणवलं!

मी स्वतः आता 'विश्वसंवाद' नेहमी ऐकते. विश्वफोरम कडे अजून वळलेले नाही, पण कधीतरी तेही ऐकायचा बेत करेन असं म्हणतेय. In the meantime, तुम्हालाही जर विश्वसंवाद काय चीज आहे हे पाहायचं असेल, तर विश्वसंवादची website पहा. मी वर उल्लेख केलेल्या आणि शिवाय आणखी बऱ्याच मुलाखतींचे एपिसोडस तुम्हाला ऐकायला मिळतील.

मला आवडलेले काही एपिसोडस:
१) भाग १७ आणि १८ - यशोदा वाकणकर
२) भाग २३ आणि २४ - सायली राजाध्यक्ष
३) भाग १२ - एरिक फेरिए
४) भाग ३३ - प्रसाद कुलकर्णी

Comments

  1. Ho me pn aikate ha podcast....Kahi interviews interesting hote.

    ReplyDelete

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *