Finding Resilience

तन्मयीचं routine, आमच्या नोकऱ्या, घरी येणारे-जाणारे सगळे आणि घरच्या इतर जबाबदाऱ्या यामध्ये रोज वेळ निघून कसा जातो समजत नाही. पण एखादा दिवस थोडा निवांत मिळतो तसा ७-८ दिवसांपूर्वी मिळाला, आणि रिकामं मन सैतानाचं घर व्हावं तसं झालं. तन्मयीचे seizures गेल्या ३-४ दिवसात थोडे नेहमीपेक्षा जास्त होते. त्यामुळे ती down होती. तिला खूप खेळायचं नव्हतं, धड झोप लागत नव्हती आणि एकंदरीत ती चिडचिडच करत होती. त्यामुळे जवळपास दिवसभर तिला शांत ठेवण्यात, भरपूर वेळ जवळ घेऊन बसण्यात मी घालवला. तिचे २ थेरपी सेशन्सपण होते त्यासाठी तिचा मूड चांगला ठेवण्याचं दिव्य पार पाडलं... पण त्या थेरपी सेशन्सव्यतिरिक्त इतर काही करण्याचा तिचा मूड नव्हता आणि तेवढी शक्तीही नव्हती तिला. त्यामुळे माझी धावाधाव नेहमीपेक्षा थोडी कमी होत होती.

दुपारी एकदाची ती माझ्या मांडीवर शांत झोपली आणि माझे विचार मात्र कुठच्या कुठे धावत सुटले.

एपिलेप्सी ही अशी condition आहे की ती मेंदूला अतिप्रचंड थकवते. म्हणजे मोठ्या माणसांनासुद्धा seizures होऊन गेले की पुढे काही तास झोपेची गरज भासू शकते. तन्मयी तर छोटीशी आहे. मेंदूला refresh करण्यासाठी झोपेसारखा दुसरा उत्तम उपाय नाही याचं रोज प्रत्यंतर तिला बघून आम्हाला येत असतं. एखाद्या दिवशी तिला खूप stimulation मिळालं किँवा seizures जास्त असतील तर मग ती प्रचंड थकते आणि भरपूर झोपते, तर एखाद्या दिवशी अगदी कमी झोपूनही बरीच active असते. तिच्या रोज बदलणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही शिकत असतो, स्वतःचं तिच्याशी वागणं गरजेनुसार बदलत असतो. बहुतेक सगळेच आई-वडील करतात तसंच काहीसं! 

तेच तर! सगळेच आई-वडील तर मुलांसाठी adjust करतात. मुलांचे १०० क्लासेस, शाळा, daycare यांच्या वेळांची गणितं सांभाळतात. मुलांच्या बदलत्या आवडी-निवडी सांभाळतात. मुलांचे "down-days" सांभाळतात, मुलं पडली-झडली तरी ते विसरायला लावून त्यांना पुढे जायला प्रवृत्त करतात. मग आमचंच काय असं वेगळं आहे? आम्हाला काय असं सोनं लागलंय? का exactly याच गोष्टींचा आम्हाला इतरांपेक्षा जास्त दबाव येतो?

Medical issues!! How could I forget! वरच्या वाक्यांत क्लासच्या जागी थेरपी, daycare च्या जागी हॉस्पिटलच्या भेटी, आवडी-निवडींच्या जागी औषधं, down-days च्या जागी excessive seizures असं घातलं की दिसतंच आहे काय सोनं लागलंय ते. कोडं क्षणभर सुटल्यागत झालं.

आपण, म्हणजे माणसं... मनुष्यप्राणी... अत्यंत resilient असतो. मनाने कमालीच्या बाहेर लवचिक. आपण स्वतःला खूप underestimate करतो आणि मनाला स्वतःची लवचिकता वापरण्याचा वावच देत नाही. आमच्यासारखं कुणी एखादं नकोशा कठीण परिस्थितीत सापडलं की मगच ही लवचिकता डोकं वर काढते. कारण प्रश्न जीवन-मरणाचा असतो. नाही आपण मनाची लवचिकता, कणखरपणा वापरला तर आपल्या अस्तित्वाला शून्य अर्थ राहील अशा प्रसंगीच मनाचा खरा कस लागतो. कितीही stress येत असला, हातपाय गळून जात असलेत तरी we do get off our asses and do the right thing.

तन्मयीला सगळ्यात पहिल्या MRI साठी घेऊन जायचं होतं तो दिवस मला अजून आठवतो. माझ्या मावसबहिणीला मी बोलावलं होतं "हॉस्पिटलला माझ्यासोबत चल" म्हणून. का? तर MRI च्या वेळी तन्मयीला anesthesia द्यावा लागणार होता, आणि ते माझ्याच्याने पाहावलं गेलं नसतं असं मला वाटत होतं. ती सोबत येऊ शकली म्हणून माझ्याच्याने तो दिवस निभावला. हे सगळं झालं त्याला १ वर्ष २ महिने उलटून गेले. त्यानंतर तन्मयीचा उलटच प्रवास घडत गेला (आत्ताशी कुठे आम्हाला थोडीशी course-reversal ची चाहूल लागतेय). त्या MRI नंतर तिचे भरपूर EEG झाले ज्यासाठी तिला मी आणि रोहितनं एकेकट्यानं हॉस्पिटलला नेलं. जुलैमध्ये तिला मांडीत steroids ची injections कशी द्यायची ते आम्ही शिकलो. डिसेंबरमध्ये तिला खाण्यापिण्यासाठी नाकातून पोटात नळी घालावी लागली ती कशी काढायची-घालायची ते शिकलो, त्यातून तिला खायला कसं द्यायचं ते शिकलो. Ketogenic डाएट सुरु केलं तेव्हा घरच्या घरी आपले पदार्थ त्या डाएटला चालतील असे कसे तयार करायचे ते शिकलो. आणि किती काय काय... एका वर्षात मीच किती बदलले... माझ्या मनाचाच resilience किती पणाला लागला.

काहीवेळा तन्मयी आहे तशी तिला पाहताना ज्यांना त्रास होतो अशी, किंवा तिच्याविषयी आमच्याशी openly न बोलणारी, मी काय लिहीते ते न पटणारी किंवा मी हे सगळं मोकळेपणानं लिहीते हेच मुळात न पटणारी मंडळी जेव्हा मी पाहते तेव्हा मला हतबुद्ध व्हायला होतं. अशा सगळ्यांनी स्वतःच्या मनालाच ओळखलं नाही असं वाटतं. आपण स्वतः कठीण परिस्थितीमध्ये असतो तेव्हा कल्पनेच्या पलीकडे जाऊन improvise करू शकतो त्यातून पुढे जाण्यासाठी, मग इतरांची कठीण परिस्थिती पाहताना का गळून जायला होतं? अवघड प्रश्नांना रोज तोंड देणारे जर ते प्रत्यक्ष करू शकतात, तर इतरांनी १०० कारणांच्या मागे का लपावं? अशा व्यक्ती स्वतः स्वतःलाच किती छोटंसं करून ठेवतात! We as humans are capable of so much much more than that! I'll end with these two pearls of wisdom I find helpful when I find myself without resilience to move through a storm. बाकी, to each his own!

"I can be changed by what happens to me. But I refuse to be reduced by it." - Maya Angelou.  

"When we tackle obstacles, we find hidden reserves of courage and resilience we did not know we had. And it is only when we are faced with failure do we realize that these resources were always there within us. We only need to find them and move on with our lives." - A.P.J.Abdul Kalam



Comments

Contact Me

Name

Email *

Message *