Cognition (आकलन) and Expression (अभिव्यक्ती)

Life is 10% what happens to you and 90% how you react to it. हे वाक्य आपण सगळ्यांनी कमीत कमी एकदातरी ऐकलेलं आहे. पण तुमच्या बाबतीत घडणाऱ्या १०% गोष्टींनी तुमची react करण्याची क्षमताच क्षीण केली तर?


आपण लहानपणापासून जे communication शिकतो, भाषाज्ञान मिळवतो ते दोन प्रकारचं असतं - expressive आणि receptive. लहान मूल receptive भाषा सर्वात आधी शिकतं. आपले आई-बाबा, आजी-मावश्या आणि इतर सगळे काय बोलतायत, त्यांचे चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव, हातवारे या सगळ्याच्या माध्यमातून लहान मूल आजूबाजूचं जग ओळखायला शिकत असतं. त्यानंतर येतो तो टप्पा नक्कल करण्याचा. आजूबाजूची मोठी माणसं करतील तसं करण्याचा, ते बोलतील तसं बोलण्याचा. आणि सर्वात शेवटी येतं ते free expression. म्हणजे स्वतःच्या मनात जे विचार आहेत ते ओळखता येणं आणि शब्दांच्या, sign language च्या किंवा इतर साधनांच्या माध्यमातून मांडता येणं. हे शेवटचं आहे ते free expressive communication. आपण मोठे होतो तशा या सर्व प्रक्रिया मेंदू खूप कौशल्याने एकाच वेळी पार पाडत असतो, त्यामुळे आपण इतरांशी संवाद साधून त्यांच्या मनातलं जाणून घेऊ शकतो आणि आपल्या मनातलं तिथंच लगेच मांडू शकतो.

या सर्व प्रक्रियांना आपण इतकं गृहीत धरलेलं असतं नं, की एपिलेप्सी, सेरेब्रल पाल्सी इ. सारखे मेंदूचे आजार जडल्याशिवाय आपल्याला मेंदूच्या कामाचा आवाका लक्षातच येत नाही. या संपूर्ण process मधला एक जरी टप्पा miss झाला तरी आपली पूर्ण communication system च ढासळते आणि बाहेरच्या जगाशीच काय, पण स्वतःशी संवाद साधणंसुद्धा मुश्किल होऊन जातं .

एपिलेप्सीचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे मेंदूची ही communication system सांभाळण्याची क्षमता नष्ट किंवा कमजोर होणे! ऐकणे, समजून घेणे, त्यावर विचार करणे आणि ते विचार व्यक्त करणे या चार गोष्टी मेंदू एकाचवेळी करू शकेलच असं नाही. म्हणजे कानांनी ऐकू येतंय पण समजत नाही. समजत नाही तर विचार तरी काय करणार. आणि विचारच नाहीत तर व्यक्त काय करणार! काहीवेळा ऐकू येतं, समजतंही पण शरीरावर मेंदूचा control नसतो त्यामुळे जे काही थोडेफार विचार मनात येत असतील ते व्यक्तच करता येत नाहीत.

ज्यांची या प्रकारची development अजून व्हायची असते अशा तन्मयीसारख्या लहान मुलांची यात सगळ्यात अवघड अवस्था होते. मी अगदी जवळून तन्मयीलाच पाहतेय, त्यामुळे तिचंच उदाहरण देईन. तिला एपिलेप्सी आहे हे जमेला धरता, तिच्या वयाच्या मानाने तिला receptive communication खूपच चांगलं येतं. अगदी ७-८ महिन्यांपूर्वी मला विचारलं असतं तर मी हे इतक्या खात्रीनं सांगूही शकले नसते, पण आता सांगू शकते की तिला मराठी आणि इंग्रजीत जे बोलतो ते बरंचसं समजतं. पण त्यावर विचार करणं, तिची स्वतःची मतं असणं (थोडक्यात शिंगं फुटलेली असणं) आणि ते तिनं व्यक्त करणं यासाठी तिला भरपूर कष्ट घ्यावे लागणार आहेत. तिला आणि आम्हालाही.

एक अगदी सोपं उदाहरण देते... "Bend your knees" किंवा "गुडघे वाकव" हे साधं वाक्य घ्या. यात "गुडघे" म्हणजे काय ते समजणं - म्हणजे तो शरीराचा एक अवयव आहे, त्याची जागा कुठे आहे इ.; "वाकव" म्हणजे काय ते समजणं हा झाला receptive language चा भाग. मला आत्ता कुणीतरी ही action करायला सांगतंय ती मला करायची आहे अथवा नाही हे समजणं ही झाली मधली विचारांची step. आणि मेंदूनं योग्य अवयवाला हलण्याची आज्ञा देऊन प्रत्यक्ष गुडघे वाकवणं ही झाली expressive step. आताशी कुठं तन्मयी या प्रकारच्या साध्या साध्या instructions ऐकून योग्य ती action घ्यायला शिकते आहे. "Bend your knees", "put your head down", "get your head up", "eyes up/down", "come find me", "look at me" अशा छोट्या छोट्या गोष्टींत ती आता तरबेज आहे.

तिच्यासाठी चालू केलेली speech therapy म्हणजे या विषयातली तिची शाळाच असते. मनुष्यजात एकूणच किती समाजप्रिय आहे याचं प्रत्यंतर प्रत्येक speech therapy च्या तासाला मी घेते. तन्मयीसारख्या communication मध्ये कमजोर असलेल्या मुलीतही स्वतःची मतं, विचार, आवडी, गरजा समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची एक प्रकारची आंतरिक ओढ आहे. यासाठी तिला अजून आवाज वापरता येत नसला तरी हात-पाय-डोकं-डोळे वापरायला शिकवून या ओढीला तिची speech therapist इतक्या सुंदर प्रकारे योग्य वाट दाखवते की पाहतच राहावं!

आई-वडील तर आपल्या मुलांची नस ओळखतातच. मुलाला काय हवं-नको ते त्यांनी न सांगताही समजून घेतात. पण कोणत्याही लहान मुलाला शाळेत अगदी पहिल्यांदा जाताना बाहेरच्या जगात आई-वडिलांपासून वेगळं एकटं राहण्याची वेळ येते. अशा वेळी त्यांची नस ओळखणारा एखादा शिक्षक जर भेटला तर मुलांचा तो अगदी favourite होऊन जातो! Speech therapy च्या निमित्ताने तन्मयीला, आणि पर्यायानं आम्हालाही हे अनुभवायला मिळतंय.

तन्मयीला संवाद साधायला शिकवणं, त्यातून तिची आकलनशक्ती हळू हळू का होईना पण वाढवणं, तिला इतर वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी उत्तेजन देणं हे सगळं आम्ही करू पाहतोय. पण संवाद साधण्याची क्षमता मुळातच क्षीण असेल तर वेळच्या वेळी स्वतःच्या गरजा पूर्ण करून घेता येत नाहीत. त्या झाल्या नाहीत तर इतर काही करण्याचं, तन्मयीच्या case मध्ये तर अगदी हात-पाय हलवण्याचंही, motivation उरत नाही. ते केलं नाही तर शरीरात बळ कुठून येणार? स्नायूंत ताकद कशी येणार? ती आली नाही तर शरीराचा वापर संवाद साधायला करणार कधी आणि कसा? तंगड्यात तंगडी आहेत सगळी!

एपिलेप्सीमुळे सोडवायला कठीण होऊन बसलेला हा गुंता सोडवायचा तर plan of attack ही तसाच तोडीस तोड हवा! वेगवेगळ्या therapies च्या माध्यमातून तो साधता येतो. वाढत्या मेंदूची आणि शरीराची क्षमता बदलेल तसा तो बदलत राहावा लागतो. Physical therapy च्या बाबतीत आम्ही हे सगळ्यात जास्त पाहत आलोय. पुढच्या पोस्टमध्ये शरीराच्या प्रत्यक्ष हालचालींवर मेंदूचं नियंत्रण, एपिलेप्सीमुळे त्यात कसे घोटाळे होतात आणि physical therapy चा त्याच्याशी संबंध याविषयी लिहीन! सध्या इथेच थांबते.






Comments

Contact Me

Name

Email *

Message *