एपिलेप्सी (Epilepsy) म्हणजे काय?
माझ्या याआधीच्या काही पोस्टमधून मी तन्मयीच्या seizures चा उल्लेख बरेचदा केलाय. आपल्याकडे बहुतेकांना ते काय आहे हे माहीत नसणार हे माझ्या तेव्हा लक्षातच आलं नव्हतं. तन्मयीला हे detect होण्यापूर्वी आम्हालाही माहीत नव्हतं तर काय! म्हणून ठरवलं की काहीतरी समज-गैरसमज होण्यापेक्षा आपणच explain करावं. Hopefully I have succeeded in doing so succinctly and in simple terms.
__________________________________
मेंदू
माणसाचा किंवा कोणत्याही प्राण्याचा मेंदू हा किती महत्त्वाचा अवयव आहे हे नव्यानं सांगायला नको. आपण करत असलेल्या हालचाली, विचार, आपल्याला जाणवणाऱ्या भावना, पंचेंद्रियांद्वारे होणारं ज्ञान, आपलं वागणं-बोलणं-लकबी सर्व काही आपला मेंदू नियंत्रित करत असतो. इतकंच नव्हे तर आपल्या शरीराचं तापमान, ह्र्दयाच्या ठोक्यांची गती, आपलं श्वसन, इच्छा-आकांक्षा, स्वप्नं हे सगळं, सगळं मेंदू handle करतो! मेंदूच्या विविध भागांकडे ह्यापैकी एकेका गोष्टीची जबाबदारी असते. उदा. एक भाग आपल्या सर्व आठवणींचा साठा करतो, एक भाग आपली दृष्टी नियंत्रित करतो, तर एक भाग आपली वाचा. अशाप्रकारे मेंदूत कामांची विभागणी अतिशय efficiently केलेली असते. मेंदूचे सर्व लहानमोठे विभाग एकमेकांशी आणि आपल्या इतर अवयवांशी अव्याहत (nonstop) संवाद साधत असतात म्हणून आपण सुसंगत हालचाली आणि विचार करू शकतो.
न्यूरॉन्स (Neurons)
न्यूरॉन्स, म्हणजेच मेंदूतल्या पेशींच्या माध्यमातून हा संवाद साधला जातो. आपली मज्जासंस्था (nervous system) ह्या पेशी वाहून नेण्याचं काम करते. बाकीच्या शरीराशी होणारं communication सध्या आपण बाजूला ठेवूया. मेंदूतल्या मेंदूतसुद्धा electro-chemical signals द्वारे ह्या पेशींचं वहन होतं जेणेकरून मेंदूचा एक विभाग दुसऱ्या विभागाला आपलं काय चाललंय ते कळवू शकतो, ज्यामुळे आपण multitasking करू शकतो - जसं की मी आत्ता हे type करतेय ते हाताने (मेंदूतला हाताना control करणारा विभाग), पण माझे डोळे ती अक्षरं वाचतायत (दृष्टिविभाग), आणि मी आधी लिहिलेलं वाक्य पुढच्या वाक्याशी सुसंगत आहे की नाही ते पडताळून पाहण्याचं काम माझ्या मेंदूतला तिसराच विभाग करतोय. अशा जवळजवळ १० हजार कोटी पेशी आणि त्यांचं network आपल्या मेंदूत अखंड काम करत असतं.
नीट विचार केलात तर सहज लक्षात येईल की हे वरवर साधं वाटणारं काम किती अवघड आणि गुंतागुंतीचं आहे. त्यामुळेच तर, मेंदूचं वजन आपल्या शरीराच्या वजनाच्या केवळ २%असलं, तरी आपल्या ह्रदयाकडून शरीराला होणाऱ्या रक्तपुरवठ्यापैकी २०% रक्त मेंदूला मिळतं! इतका छोटासा अवयव शरीराची २०-२५% ऊर्जा वापरतो.
मुख्य म्हणजे माणसाच्या मेंदूचं संपूर्ण आकलन अजून माणसाला व्हायचंय. न्यूरॉन्स वेगवेगळी माहिती इकडून तिकडे कशी पोहोचवतात, ठराविक प्रकारचे (specialized) न्यूरॉन्स ठराविक प्रकारची माहिती carry का करतात, मेंदूचे कोणते विभाग आपल्या कोणत्या हालचाली अथवा भावनांशी निगडीत आहेत ह्याविषयी संपूर्ण संशोधन व्हायचंय.
पण जे काही संशोधन आत्तापर्यंत झालेलं आहे त्यातून न्यूरॉन्स आणि त्यांचं information network विस्कळीत करून सोडणाऱ्या किंवा क्वचित त्यांचा ऱ्हास करणाऱ्या बऱ्याचशा आजारांबद्दल आता माणसाला माहिती झालेली आहे... जसं की अल्झायमर्स, विस्मरण (dementia), पार्किन्सन्स, मायस्थेनिया ग्रॅव्हिस इ. तसाच एक न्यूरॉन्सचं communication फिसकटवणारा disorder म्हणजे एपिलेप्सी.
एपिलेप्सी (Epilepsy) आणि सीझर्स (Seizures)
मराठीत एपिलेप्सीला अपस्मार म्हणतात. एपिलेप्सीनं ग्रासलेल्या लोकांना जे फेफरे किंवा झटके येतात त्याला सर्वसाधारणपणे Seizures (सीझर्स) किंवा फीट येणे असं म्हणतात. मेंदूतल्या electrical signals च्या कामात तात्पुरता अडथळा/व्यत्यय (एक प्रकारचा ट्रॅफिक जॅम) निर्माण झाल्यामुळे हे होतं. Seizures चं बाह्यस्वरूप हे एखाद्या व्यक्तीच्या मेंदूच्या कोणत्या भागात ट्रॅफिक जॅम झालेला आहे त्यानुसार बदलतं. एखाद्याचा एकच डोळा, किंवा चेहरा यांना कंप सुटतो. एखाद्याचे फक्त हात-पाय थरथरतात. काहींचं इतर काही नाही तर केवळ लक्ष विचलित होतं. तर काहींचं एकदम दुसरं टोक, की ज्यात संपूर्ण शरीर वेडेवाकडे होऊन शुद्ध हरपते. अशा वेगवेगळ्या स्वरूपात एपिलेप्सी आपल्या समोर येऊ शकते. बहुतेकवेळा हे परिणाम तात्पुरते असतात. पण seizures जर सलग काही तास होत राहिल्या तर मेंदूला इजा पोहोचू शकते.
जेव्हा seizures होत नसतात तेव्हा असे लोक fully functioning असतात हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. लहान बाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुणालाही हा आजार असू शकतो, किंवा नव्यानं जडू शकतो. मेंदूला झालेली गंभीर दुखापत किंवा जन्मजात दोष यामुळे सहसा अपस्माराचा त्रास जडतो. पण बहुसंख्य वेळेला ह्या condition चं मूळ कारण शेवटपर्यंत समजत नाही, आणि रुग्ण व त्यांच्या कुटुंबाला कारण समजणारच नाही हे accept करून पुढे जावं लागतं.
एपिलेप्सीचं निदान आणि त्यावरचे उपचार
एपिलेप्सीचं निदान हे न्यूरॉलॉजिस्ट मुख्यतः एमआरआय स्कॅनिंग आणि ईईजीच्या माध्यमातून करतात.
ऍलोपॅथीमध्ये एपिलेप्सीवर ३-४ प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत - औषधं, specialized डाएट किंवा सर्जरी. त्यापैकी औषधोपचार हा सर्वप्रथम try करतात. त्याने seizure control नाही आला तर इतर उपायांचा विचार केला जातो. सगळेच उपाय सगळ्याच प्रकारच्या seizures ना लागू पडतात असं नाही. त्यामुळे seizures चं कारण कळलं तर काहीवेळा जास्त targeted उपाय करता येणं शक्य असतं.
अर्थात मी देतेय ही सर्व आमच्या तन्मयीबाबत आलेल्या अनुभवातून जमा झालेली जुजबी माहिती आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंच सगळं पार पाडणं हे केव्हाही जास्त चांगलं.
आणि मी सुरुवातीला म्हणाले त्याप्रमाणे माणसाचा मेंदू हा माणसासाठीच एक mystery आहे. इतर अवयवांबाबतच्या संशोधनाच्या मानाने मेंदूबद्दलच्या संशोधनात आपण अजून खूपच मागे आहोत. त्यामुळे एपिलेप्सीसाठी वापरली जाणारी औषधं व डाएट हे नक्की शरीरात कसकसे बदल घडवतात हे अजून न्यूरॉलॉजिस्टनाच खात्रीशीर explain करता येत नाही. पण विज्ञान इतक्या वेगानं पुढे जातंय की कधी कोणती नवीन माहिती समोर येईल ज्याचा एपिलेप्सीच्या patients ना उपयोग होईल हे सांगता येत नाही. आम्हीही गेल्या पाच-सहा महिन्यात असे अनुभव घेतोय! It is all incredible! त्यामुळे सगळं काही धीरानं घेणे आणि आपला positive approach न सोडणे हाच सगळ्यात best option! Everything else eventually falls in place.
एपिलेप्सीबद्दलची पुढची पोस्ट : Epilepsy 101

Comments
Post a Comment