Epilepsy Awareness: Epilepsy 101

अमेरिकेत नोव्हेंबर महिना National Epilepsy Awareness Month म्हणून साजरा केला जातो. World Health Organization च्या आकडेवारीनुसार जगभरात जवळजवळ ५ कोटी लोक epilepsy ने ग्रासलेले आहेत. त्यातले ८०% लोक हे गरीब देशात राहतात. श्रीमंत देशांपैकी फक्त अमेरिकेतच दरवर्षी Epilepsy च्या साधारण १.५ लाख नवीन केसेस आढळून येतात. Epilepsy वरचे उपाय अजून म्हणावे तसे सगळीकडे पोहोचलेले नाहीत, आणि सर्वाना परवडतील असेही नाहीत.

पण या आकडेवारीत हरवून जाणं खूप सोप्पंय. माझ्या ह्या पोस्टसाठी आपण जरा त्यातून बाहेर येऊया आणि epilepsy विषयी थोडी वस्तुस्थिती जाणून घेऊया. Epilepsy म्हणजे काय, seizures दिसतात कसे, त्याची कारणं काय आणि treatment options कोणते याबाबत आपल्याला सहसा काहीही माहीत नसतं.

Epilepsy म्हणजे नक्की काय ? 
तर मेंदू आणि nervous system यांच्यावर प्रतिकूल परिणाम करणारा हा आजार आहे. याला Seizure Disorder असंही म्हटलं जातं.

But what does that even mean? What does a seizure look like?

Seizures चे प्रकार 
Seizures चं स्वरूप आणि एखाद्याला आपल्यासमोर ते होत असतील तर कसं ओळखायचं याविषयी आपल्याकडे awareness जवळजवळ नसतोच. बऱ्याचदा आपण टीव्हीवर बघतो किंवा कुणाकडूनतरी ऐकतो ते म्हणजे "फीट आली." पण म्हणजे नेमकं काय झालं, त्याचे त्या मनुष्याच्या हालचालींवर परिणाम नक्की कसे झाले, फीट येणं थांबल्यावर काय होतं इ. विषयी बोलणं होत नसल्यानं ते आपल्याला माहीत नसतं. किंवा ज्यांना माहीत असतं त्यांची माहितीपण मर्यादित असते. मुळात सर्वांना माहीत असलेलं "फीट" येण्याचं स्वरूप हा seizures चा निव्वळ एक प्रकार आहे. असे seizures चे बरेच प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारात दिसणारी लक्षणं ही इतर प्रकारांपेक्षा वेगळी असतात.

Seizures मेंदूच्या कोणत्या भागात सुरु झालेत, seizures होणारी व्यक्ती कितपत भानावर आहे आणि तिच्या शरीराची हालचाल कशी आहे यावरून मुख्यतः ४ प्रकारच्या seizures असतात असं म्हणता येईल -
१) मेंदूच्या दोन्ही बाजूंवर परिणाम करणाऱ्या, ज्यात व्यक्ती बेशुद्ध होते,
२) मेंदूच्या दोन्ही बाजूंवर परिणाम होतो पण व्यक्ती थोडीशी का होईना भानावर असते,
३) मेंदूच्या ठराविक भागातच परिणाम मर्यादित असतो आणि व्यक्ती बेशुद्ध नसली तरी पूर्णतः भानावरही नसते आणि
४) मेंदूच्या ठराविक भागावर परिणाम होतो पण व्यक्ती पूर्णपणे भानावर असते.
या सर्व प्रकारातला समान धागा म्हणजे seizures होणाऱ्या व्यक्तीचा या ना त्या प्रकारे स्वतःच्या शरीरावरचा सुटलेला ताबा! तो किती degree ला सुटलाय यावरून वेगवेगळ्या seizures ओळखता येतात. उदाहरणार्थ, एका प्रकारात व्यक्तीचे फक्त हातच jerk होतात किंवा पायाची बोटंच twitch होतात. अशावेळी त्या व्यक्तीचे हात आपण धरले तरी हलायचे थांबत नाहीत. दुसऱ्या एखाद्या प्रकारात व्यक्ती शुद्धीत असते, पण क्षणार्धात स्तब्ध होते आणि तिचे डोळे वरच्या दिशेला वळतात. असं होत असताना त्या व्यक्तीला हाक मारली तरी ती व्यक्ती आपल्याकडे बघू शकत नाही. Generally आपण "फीट आली" असं म्हणतो त्यात व्यक्ती बेशुद्ध होते आणि तिचं शरीर अनियंत्रितपणे थरथरतं. सगळ्या प्रकारच्या seizures या life-threatening नसतात, पण वेळेत उपाय झाला नाही तर हा शेवटचा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. Majority seizures च्या प्रकारात व्यक्ती बेशुद्ध होत नसली तरी पूर्णतः भानावरही नसते...जणू तंद्री लागल्यासारखी असते. आणि शरीराची किंवा एखाद्या अवयवाची अनियंत्रित हालचाल इतकी सूक्ष्मपणे होत असते की समोरच्याला जर नीट माहिती नसेल तर समजणारही नाही की त्या व्यक्तीला seizures होतायत.

Seizures होण्याची कारणं 
Seizures कधी होतील यावर रुग्णाचा काहीही control नसतो. पुष्कळदा seizures होतात ते without any warning! पण काहीजणांच्या बाबतीत seizures होण्यासाठी कोणतातरी एखादा trigger कारणीभूत असतो. उदाहरणार्थ, झोप पूर्ण न होणे, flashing lights, low blood sugar, अल्कोहोलचा अतिरेक, कॉफीचा अतिरेक, सर्दी-खोकला-ताप इ.

पण ही झाली तात्कालिक कारणं. ही सगळी आपल्याला दूर करता येऊ शकतात. पण तसं केलं आणि seizures थांबले असं होत नाही. म्हणजेच epilepsy ची आणखी मूलभूत, सहज दूर करता न येणारी कारणं असणार हे clear आहे. वैद्यकशास्त्र याला "epilepsy syndrome" असं नाव देतं. एखाद्याला epilepsy ने ग्रासण्याची मूळ कारणं शोधताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात, जसं की रुग्णाच्या घरातल्या कुणाला epilepsy आहे का, seizures genetically inherited आहेत का, कोणत्या वयात प्रथम सुरु झाल्या, कोणत्या प्रकारच्या seizures आहेत, त्याची तात्कालिक कारणं कोणती, दिवसातून कितीवेळा आणि किती वाजता होतात, त्या व्यक्तीला इतर काही आजार नाहीत नं वगैरे वगैरे.

मुख्य लक्षात घेण्याची गोष्टी ही आहे की epilepsy किंवा seizures हा संसर्गाने पसरणारा आजार नाही.

Epilepsy ची मूलभूत कारणं शोधूनही सापडत नाहीत हे सत्य अनेकजणांच्या वाट्याला येतं. अशा परिस्थितीत इथून पुढे होणारं वैद्यकीय संशोधन हाच एकमेव उपाय सध्या अस्तित्वात आहे.

Treatment Options
इतर असंख्य आजारांप्रमाणे epilepsy साठी औषधोपचार आहेतच. मिळाला तर औषधांनीच पटकन seizures वर control मिळू शकतो. आणि seizures वर लवकरात लवकर control मिळवून मेंदूला होणार अपाय थांबवणं अत्यावश्यक असतं. I cannot emphasize how important this is! पण ही औषधं थेट मेंदूवर परिणाम करणारी असल्यानं दुर्दैवानं  त्यांचे side effects ही खूप आहेत. छोटासा dose सुद्धा काय परिणाम दाखवेल हे बऱ्याचदा सांगता येत नाही.

औषधोपचारांखेरीज काही वेगळ्या प्रकारच्या treatments ही असतात. जसं की - सर्जरी, Ketogenic diet किंवा Modified Atkins diet वगैरे. काही कंपन्या आजकाल शरीरात टाकता येतील असे medical devices ही तयार करतात ज्याने seizures होण्यापूर्वीच किंवा होत असताना थांबवता येऊ शकते. पण जशी सगळी औषधं सगळ्यांना लागू पडत नाहीत, तसेच हे सगळे उपायही सगळ्यांना चालतातच असं नाही.

आयुर्वेद अथवा इतर alternative medicine च्या शाखाही आहेत, पण त्यातून मिळणारे उपाय हे तात्काळ seizures थांबवण्यासाठी कितपत उपयोगी आहेत याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे मी त्याविषयी आत्तातरी काही इथं लिहीत नाही. चुकीचं लिहिण्यापेक्षा न लिहिलेलं चांगलं.
Epilepsy नं आमच्या आयुष्यात ठाण मांडल्यापासून आम्हाला आलेले seizures चे अनुभव मी पुढच्या पोस्टमध्ये share करेन. So stay tuned...


एपिलेप्सीबद्दलची याआधीची  पोस्ट : एपिलेप्सी (Epilepsy) म्हणजे काय? 
एपिलेप्सीबद्दलची पुढची पोस्ट: Outlier



Comments

Contact Me

Name

Email *

Message *