Cognition (जाण किंवा आकलनशक्ती)

विचार करा की तुम्ही एखादा अशोक सराफचा सिनेमा पाहताय. त्यातलं एखादं गाणं चालू आहे आणि अशोक सराफ कोणत्यातरी नटीबरोबर नाचतोय. तुमच्या मनात चट्कन विचार येऊन जातोय की काय अशक्य नाचतोय हा! तुमच्याही नकळत तुमच्या मनात आधी कधीतरी पाहिलेली ह्रतिक रोशनची गाणी आणि त्यातला त्याचा out of this world नाच येऊन जातो. नकळत तुलना होते आणि अशोक सराफच्या नाचाविषयी हे विचार मनात येतात. त्याचबरोबर तुम्ही गाणंही ऐकत असताच. गायकाचा आवाज, दिलेलं संगीत ऐकून त्याविषयी विचार करत असता. बरोबरीने पॉपकॉर्न किंवा इतर काही चरत असाल तर थोडं लक्ष त्या खाद्यपदार्थांची चव, वास याकडेही असतं... थिएटरमध्ये सिनेमा पाहत असाल तर AC चा गारवा अंगाला जाणवत असतो. हे सगळं मिळून सिनेमाचा अनुभव जुळून येतो. 

आता हेच सगळं परत परत वाचा. प्रत्येक शब्दा-वाक्याकडे नीट लक्ष देऊन पाहा आणि समजून घ्या. पॉपकॉर्नच्या वासाकडे, चवीकडे आपलं "लक्ष असतं" म्हणजे नक्की काय असतं? अशोक सराफचा नाच पाहताना तुम्हाला मधेच ह्रतिकच्या नाचाचा "contrast आठवतो" म्हणजे नेमकं काय होतं? AC च्या गारव्याने तुम्हाला किंचित थंडी वाजल्याची "जाणीव होते" तेव्हा नेमकं काय घडतं? तर पंचेंद्रियांपैकी प्रत्येक इंद्रियाकडून आणि अवयवांकडून जाणाऱ्या मेसेजेसचं मेंदू real-time interpretation करत असतो आणि त्यानुसार प्रतिक्रिया ठरवून शरीराला पुढे काय करायचं याच्या आज्ञा देत असतो. एका सिनेमाचा संपूर्ण अनुभव आपल्या मनात तयार होण्यासाठी कान-नाक-डोळे-जीभ-त्वचा ही पंचेंद्रियं, आपल्या मेंदूचा ह्रतिकचे नाच जिथं साठवलेयत तो आठवणींचा कप्पा आणि अशोक सराफशी त्याची तुलना करताना वापरला जाणारा मेंदूचा विशिष्ट भाग या सगळ्याचं गणित पक्कं जुळून यावं लागतं. तेव्हा कुठे आपल्याला सिनेमा "अनुभवला" असं वाटतं. 

मेंदू हा माणसाच्या आकलनशक्तीचा मुख्य नियंत्रक आहे. Brain is the driver of our cognitive process. आपली पंचेंद्रियं, हात-पाय इ. आपल्या सभोवतालच्या गोष्टींशी interact करणारे अवयव यांचं perfect coordination ठेवायचं काम मेंदू करतो. आपल्या संपूर्ण शरीरातल्या कोणत्या अवयवांचं कोणत्या क्षणी काय चालू आहे याची खडानखडा माहिती मेंदूला असते. पंचेंद्रियांकडून येणारं input process करून योग्य ते output देण्याचं काम मेंदू अखंड करत असतो. मागच्या एका पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे हे सगळं काम मेंदूतल्या न्यूरॉन्समध्ये सतत दिल्या जाणाऱ्या electro-chemical signals मार्फत पार पडतं. 

एपिलेप्सीमध्ये हेच न्यूरॉन्सचं तंत्र बिघडलेलं असतं (पाहा: एपिलेप्सी म्हणजे काय?). 

वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षानंतर एखादी नवीन गोष्ट शिकताना तिचा खूप सराव केला की आपल्याला ती गोष्ट जमायला लागते. किंवा आणखी मोठं झाल्यावर कित्येकदा असंही जाणवतं की शाळेत आपल्याला समजायला जड जाणारी एखादी concept निव्वळ आपलं वय वाढलं (म्हणजेच मेंदूची क्षमता वाढली) की थोडी सोपी वाटायला लागते. पोहणं, सायकलिंग यासारख्या गोष्टी तर एकदा शिकल्या की माणूस विसरतच नाही.  

पण वयाच्या पाच-सहाव्या वर्षापर्यंत मेंदूची "आकलनशक्तीचा नियंत्रक" ही ओळख अजून तयार होत असते. मेंदूचा स्वतःचाच त्या भूमिकेत शिरण्याचा सराव चाललेला असतो. त्यामुळे अशा वयात - म्हणजे तन्मयीइतक्या लहान वयात - एपिलेप्सी ज्यांना होते त्या मुलांची अवस्था कठीण असते. त्यांच्या मेंदूला शरीर नियंत्रित करायला स्वतःला शिकवावं लागतं. आणि seizures मुळे त्या प्रक्रियेत सतत अडथळा येत असतो. याचे दोन परिणाम होऊ शकतात. 


Lethargic Tanmayee - Oct 2018
(Also swollen from temporary
steroids treatment!)
पहिला म्हणजे आजूबाजूच्या गोष्टींचं input पंचेंद्रियं आणि इतर अवयव घेत असतात, ते मेंदूपर्यंत पोहोचतही असतात, पण पुढे त्याचं काय करायचं हे मेंदूलाच समजत नसतं! त्यामुळे अशावेळी output सुद्धा काही दिसत नाही. यातून निष्क्रियता येते. Almost a kind of paralyzed state. आधी शिकलेले skills सुद्धा मेंदू विसरु शकतो. ज्या मुलांच्या ह्रदयावर अशा प्रकारचा परिणाम होतो त्यांचंतर ह्रदयही निष्क्रिय होऊ शकतं. तन्मयीचंच उदाहरण द्यायचं तर तिला एपिलेप्सी जडण्यापूर्वी ती मस्त हसायची. काही ठराविक खेळ-पुस्तकं तिला आवडायची, ती आम्ही चालू केली की मजेत पाय उडवायची. एपिलेप्सी जडली आणि seizures वाढलेत तसं तिनं हे सर्व करणं बंद केलं. तिचा मेंदू जणू विसरलाच हे सगळं करायला. मधला काही काळ असाही होता जेव्हा तिचं सभोवतालच्या गोष्टींना react होणं संपलं होतं.  


May 2019
दुसरा मोठा परिणाम म्हणजे मेंदू चुकीच्या गोष्टीही शिकतो आणि योग्य त्या पद्धतीनं शरीरावर नियंत्रण मिळवू शकत नाही! यातून वेगवेगळे sensory processing disorders किंवा dyslexia सारख्या learning disabilities उद्भवतात. आपल्याला साध्या वाटणाऱ्या गोष्टींना ही मुलं घाबरतात, किंवा वेगळंच काहीतरी react करतात जे आपल्याला समजत नाही. उदाहरणार्थ, सध्या तन्मयीशी खेळताना कधीकधी ती एकदम दोन्ही हात वर घेते आणि समोर आणते, तिच्या श्वासोच्छवासाची गती वाढते, आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र smile येतं. तिला प्रथमच भेटणाऱ्या व्यक्तीला याचा अर्थ लागणंच शक्य नाही. पण आम्हाला समजतं की ती खूप excite झालीय आणि जे काही खेळतोय त्यात तिला मजा येतेय. पण म्हणून प्रत्येकवेळी ती excite झाल्यावर अशीच  react होईल असंही नाही. कधीकधी ती अगदी नवख्या व्यक्तीलाही समजेल इतकी पद्धतशीरसुद्धा react होते! 

But there is a silver lining to all of this. मोठ्या माणसांच्या matured मेंदूकडे specialized skills असले तरी नवनवीन गोष्टींचं आकलन आपल्याला चट्कन होत नाही. एवढ्या लहान वयात तसं नसतं. इतक्या लहान वयामध्ये नवीन गोष्टी शिकायला मेंदू सर्वात जास्त समर्थ असतो. जवळजवळ १० हजार कोटी पेशी आणि त्यांचं network लहान मुलांच्या मेंदूत अखंड काम करत असतं. या प्रचंड मोठ्या साठ्याचा वापर करून योग्य त्या थेरपिमधून मुलांच्या मेंदूला आपण अतिशय योग्य प्रकारे जागं करू शकतो. त्यांना शरीराचं नियंत्रण शिकवू शकतो. हे सगळं मी खरंतर एका वाक्यात लिहिलं पण थेरपीच्या एका तासात होणारी ही गोष्ट नव्हे. आमच्याच उदाहरणावरून मी सांगू शकते की थेरपीत शिकलेल्या गोष्टी अव्याहत तन्मयीशी बोलता-खेळताना वापरून आत्ताशी कुठे आम्हाला तिच्या जरा-जरा बदल दिसतोय. 

This is from just a week ago - July 2019
She is now so motivated to control her own body!
She is standing with assistance in this photo.
या सगळ्यात मी एपिलेप्सीचा औषधांचा उल्लेख करायला विसरले तर चुकीचं ठरेल. Seizures च्या रूपाने मेंदूत जे चुकीचे signals fire होत असतात, त्यांना औषधांचा वापर करून थांबवणंही फार आवश्यक असतं. तसं केलं नाही तर सगळी नवीन शिकवण आणि थेरपी हे पालथ्या घड्यावर पाणी असतं! मी परत तन्मयीचंच उदाहरण देईन. तिच्यासाठी physical therapy आम्ही सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु केली. तेव्हा तर physical therapist ने हात जरी लावला तरी तन्मयी अखंड रडत बसायची. वर म्हणालेय नं मी तसं sensory processing disorder सारखं काहीसं. अनोळखी स्पर्शाच्या बाबतीत तिच्या मेंदूची आकलनशक्ती जवळपास शून्य होती. एपिलेप्सी तिच्या मागे लागली ती जानेवारी २०१८ मध्ये. त्यानंतर ती हात-पाय हलवण्यापासून सगळं विसरली, ते साधारण फेब्रुवारी/मार्च २०१९ पर्यंत. त्या वर्षभरात तिच्या seizures वर म्हणावा तसा control आम्हाला मिळवता आलाच नव्हता. जवळपास १० वेगवेगळ्या treatments आणि औषधं try करून शेवटी मार्च २०१९ च्या सुमारास तिचे seizures जरा कमी झालेत आणि लगेचच आम्हाला तिच्या आकलनशक्तीत फरक दिसला. नवीन शिकलेल्या गोष्टी तिच्या लक्षात राहू लागल्या. समजून-उमजून ती smile सुद्धा करू लागली. 

आता हल्ली आम्ही तिला intentionally काही गोष्टी शिकवतो. त्यासाठी आम्हाला सगळ्यात जास्त मदत speech and language therapist ची होते. ती कशी, ते पुढच्या पोस्टमध्ये लिहीन. आज इतकंच पुरे नं?! 

Comments

Contact Me

Name

Email *

Message *